Baba Siddique Shot Dead Live Update : बाबा सिद्दिकी प्रकरणातील चौथ्या आरोपीची ओळख पटली, मोहम्मद झिशान अख्तरच्या शोधात पोलिसाची टीम
Baba Siddique Death Update : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
LIVE
Background
Baba Siddique Bandra Firing Case Update : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. वांद्रे पूर्व परिसरातील खेरवाडी येथील आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोरच हा गोळीबार झाला आहे. त्यामध्ये दोन जणांना ताब्यात घेतलं असून पोलिस याचा तपास करत आहेत. आरोपींनी सिद्दिकी यांच्या हत्येसाठी जे पिस्तुल वापरले होते, ते जप्त करण्यात आले आहे. सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाल्याचे समजताच अभिनेता संजय दत्त, अभिनेता सलमान खान यांनी लीलावती रुग्णालयात धाव घेतली होती. सिद्दिकी यांच्या मृतदेहाचे कूपर रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे.
बाबा सिद्दिकी यांना 15 दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी आली होती. त्यानंतर त्यांना राज्य सरकारने वाय दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्यावर गोळीबार झाला आहे.
Baba Siddique Murder Update : बाबा सिद्दिकी प्रकरणातील चौथ्या आरोपीची ओळख पटली, मोहम्मद झिशान अख्तरच्या शोधात पोलिसाची टीम
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील चौथ्या आरोपीचीदेखील ओळख पटली. चौथ्या आरोपीचे नाव मोहम्मद झिशान अख्तर असल्याची माहिती समोर आली आहे. फरार शिवानंद आणि चौथ्या आरोपीचा तीन राज्यांमध्ये पोलिसांकडून युद्धपातळीवर शोध घेण्यात येतोय.
बाबा सिद्धीकी यांची हत्या करून पळालेल्या शिवाचं शेवटचं लोकेशन पनवेलमध्ये, राज्याबाहेर गेल्याचा संशय
बाबा सिद्धीकी यांची हत्या करून पळालेल्या आरोपी शिवानंदचं शेवटी पनवेलमध्ये दिसून आला आहे.
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हा आरोपी ज्या ज्या मार्गाने पळाला त्या त्या ठिकाणचे सीसीटिव्ही तपासले
आरोपीने वांद्रेहून रिक्षाने कुर्ला स्थानक गाठले, कुर्लाहून हार्बर ट्रेन पकडून आरोपी पनवेल स्थानकावर गेल्याचे तपासात समोर
सीसीटिव्हीचा माग काढत पोलिसांना तो शेवटी पनवेलमधील सीसीटिव्हीत आढळून आला आहे
पनवेलहून आरोपी एक्सप्रेसच्या मदतीने राज्याबाहेर गेल्याचा पोलिसांना संशय
आरोपींच्या शोधासाठी उज्जेन (मध्यप्रदेश), हरियाणा, यूपी, दिल्ली या ठिकाणी गुन्हे शाखेची पथक गेली आहेत
Baba Sidique Shot Dead : बाबा सिद्दिकी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. २००४ ते २००८ या काळात ते विविध खात्यांचे राज्यमंत्री तसेच म्हाडाचेही अध्यक्ष होते.
Baba Siddique : 4 जणांनी घेतली होती बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी
२ सप्टेंबरपासून हे आरोपी कुर्ल्यात भाड्याने खोली घेऊन रहात होते.
या खोलीसाठी महिन्याला १४ हजार भाडं देत होते
४ जणांनी मिळून बाबा सिद्धीकी याच्या हत्येची सुपारी घेतली होती
प्रत्येकी ५० हजार वाटून घेणार होते
पंजाबमध्ये हे तिघं जणं एका जेलमध्ये असताना एकमेकांच्या संपर्कात आले
जेलमध्ये आधीपासून बिष्णोई गॅगचा एक सदस्य होता त्याच्या संपर्कात हे तिघं आले
या फरार आरोपीच्या शोघासाठी गुन्हे शाखेची तीन पथकं उज्जेन (मध्यप्रदेश), हरियाणा आणि दिल्ली येथे रवाना झाली असल्याची माहिती सूत्रांची माहिती
अभिनेता सलमान खानच्या घरावर ज्यावेळी हल्ला झाला. त्यावेळी देखील आरोपीचे नियोजन अशाच प्रकारे करण्यात आले होते
Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दिकी यांच्या पार्थिवाचा रात्री 8.30 वाजता दफनविधी
बाबा सिद्दिकी यांचं पार्थिव आज सायंकाळी 7 वाजता अंत्यदर्शनासाठी वांद्र्यातील निवासस्थानी आणलं जाईल.
रात्री 8 वाजता मरीन लाईन्स स्थानकाजवळील दफनभूमी येथे त्यांचे पार्थिव दफन केले जाईल