एक्स्प्लोर
Advertisement
‘संपर्क फॉर समर्थन’, अमित शाह लतादीदींच्या भेटीला
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आपल्या ‘संपर्क फॉर समर्थन’ या अभियनांतर्गत गानसम्राज्ञी लला मंगेशकर यांची भेट घेतली. लतादीदींच्या मुंबईतील निवासस्थानी रात्री साडे आठ वाजता ही भेट झाली.
मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आपल्या ‘संपर्क फॉर समर्थन’ या अभियनांतर्गत गानसम्राज्ञी लला मंगेशकर यांची भेट घेतली. लतादीदींच्या मुंबईतील निवासस्थानी रात्री साडे आठ वाजता ही भेट झाली.
लतादीदींसोबत झालेल्या भेटीवेळी अमित शाहांबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हेदेखील उपस्थित होते.
जूनच्या पहिल्या आठवड्यात अमित शाह मुंबईच्या दौऱ्यावर होते. खरंतर तेव्हाच ‘संपर्क फॉर समर्थन’ या अभियानाअंतर्गत अमित शाह लतादीदींची भेट घेणार होते. मात्र लता मंगेशकरांची प्रकृती ठीक नसल्यानं ही भेट टळली. दरम्यान, जूनमध्ये मुंबई दौऱ्यावेळी ‘संपर्क फॉर समर्थन’ या अभियनांतर्गत अमित शाहांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,उद्योगपती रतन टाटा, अभिनेत्री माधुरी दीक्षीत यांची भेट घेतली होती. केंद्र सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपने ‘संपर्क फॉर समर्थन’ हे अभियान सुरु केले. आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने भाजपच्या प्रचाराचा हा पहिला टप्पा समजला जात आहे.BJP President Amit Shah meets Lata Mangeshkar in Mumbai, as part of party's 'Sampark se Samarthan' campaign. CM Devendra Fadnavis is also present. pic.twitter.com/XPsm3PLp4s
— ANI (@ANI) July 22, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement