एक्स्प्लोर

मालगाडीवर सेल्फी घेताना भाजलेल्या तरुणाचा अखेर मृत्यू

25 हजार व्होल्ट करंट असलेल्या ओव्हरहेड वायरचा शॉक लागल्यामुळे 17 वर्षीय तरुणाचा अक्षरशः कोळसा झाला. अंबरनाथमध्ये राहणाऱ्या अनिकेत थोरातच्या मृत्यूसाठी ओव्हरहेड वायर नव्हे, तर जीवघेण्या सेल्फीचा नाद कारणीभूत ठरला आहे.

अंबरनाथ : मालगाडीवर चढून सेल्फी घेणं अखेर अंबरनाथच्या तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. या घटनेत भाजलेल्या 17 वर्षीय अनिकेत थोरात या तरुणाचा अखेर उपचारांदरम्यान मृत्यू झाला. 25 हजार व्होल्ट करंट असलेल्या ओव्हरहेड वायरचा शॉक लागल्यामुळे 17 वर्षीय तरुणाचा अक्षरशः कोळसा झाला. अंबरनाथमध्ये राहणाऱ्या अनिकेत थोरातच्या मृत्यूसाठी ओव्हरहेड वायर नव्हे, तर जीवघेण्या सेल्फीचा नाद कारणीभूत ठरला आहे. अंबरनाथच्या बुवापाड्यात राहणारा अनिकेत काल दुपारी टाईमपास करण्यासाठी रेल्वे यार्ड परिसरात आला होता. त्यावेळी तिथे मालगाडी उभी होती. अनिकेतने गार्डच्या केबिनमध्ये चढून सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र गार्डने त्याला हुसकावून लावलं. त्यानंतर सेल्फी काढण्यासाठी अनिकेत मालगाडीच्या टपावर चढला. सेल्फी काढताना तो ओव्हरहेड वायरच्या संपर्कात आला आणि जोराचा शॉक लागल्यामुळे तो खाली कोसळला. जखमी अनिकेत थोरातला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अनिकेत थोरातप्रमाणे याआधी देखील अनेकांनी सेल्फीच्या नादापायी आपला जीव धोक्यात टाकल्याच्या घटना घडल्या आहेत. मध्यतंरी सेल्फी काढण्याच्या नादात गर्भवती महिला सिंहगडावरून कोसळली. तिचं नशीब बलवत्तर म्हणून ती थोडक्यात बचावली. तर धबधब्यावर सेल्फी काढताना तोल गेल्यामुळे अनेकांनी आपला जीव गमावला आहे. हटके सेल्फी घेण्यासाठी स्काय टॉवरची टेरेस गाठण्याचं फॅडच परदेशात आलं होतं. अशा प्रकारचे व्हीडिओ यूट्यूबवर अपलोड करून पैसे कमवण्यासाठी तरुण-तरुणी आपले जीव धोक्यात घालतात. मात्र क्षणभंगुर सेल्फीपेक्षा लाखमोलाचं आयुष्य महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनालाSharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलंSatej Patil On Madhurima Raje Withdrawn : आता वाद निर्माण करायचा नाही, कालच्या विषयावर पडदा टाकतोABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Rajshree Ahirrao : दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
Maharashtra Vidhansabha election 2024: काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
Embed widget