एक्स्प्लोर

इडली-सांबार पार्सलसाठी अंबानींच्या घरातूनही स्टीलचे डबे

मुंबईतील माटुंगा इथलं कॅफे मैसूर इथलं सांबर आणि चटणी प्रसिद्ध आहे. भारतातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबांनींसाठी दररोज इडली-सांबार-चटणी इथून पार्सल जातं.

मुंबई : प्लास्टिकबंदीमुळे खवय्यांची मोठी पंचाईत झाल्याचं बघायला मिळतं. मुंबईतील माटुंगा इथलं कॅफे मैसूर इथलं सांबर आणि चटणी प्रसिद्ध आहे. भारतातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबांनींसाठी दररोज इडली-सांबार-चटणी इथून पार्सल जातं. मात्र प्लास्टिकबंदीमुळे आज त्यांच्या घरुन स्टीलचे डबे आल्याचं हॉटेल मालकाने सांगितलं. याचबरोबर बहुतांश जणांना प्लॅस्टिकबंदीमुळे इडली-सांबार पार्सल न घेता रिकाम्या हाती परतावं लागलं. एकूणच सर्वसामान्य ते श्रीमंतांना या प्लास्टिकबंदीचा फटका बसला. प्लास्टिकबंदीनंतर ब्रँडेड आणि नॉन ब्रँडेड पॅकेज्ड प्रॉडक्ट्स विक्रीबाबत अनेक दुकानदारांमध्ये संभ्रम आहे. उदाहरणार्थ हल्दीराम सारख्या ब्रँड्सच्या नावाने विकले जाणारे वेफर्स, शेव, चिवडा अशा प्रॉडक्ट्सवर बंदी नाही. तर दुसरीकडे स्वतः उत्पादन करून पॅकेजिंग करून विक्रीसाठी बाजारात आलेले लोकल ब्रँड्सच्या प्लास्टिकवर बंदी आहे. मात्र दुकानदारांना याबाबत शासन स्तरावर सुस्पष्टता नसल्याने ते संभ्रमात आहेत. राज्यभरात प्लास्टिक वापरणाऱ्यांविरोधात कारवाई प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी झाल्यानंतर राज्यभरात आज प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई सुरु आहे. प्लास्टिक वापरणाऱ्याला पाच हजार रुपये दंडाची पावती दिली जात आहे. पुण्यात महापालिकेच्या पथकाकडून सकाळपासून 73 कारवाया करत तीन लाख 69 हजार रुपयांची वसुली केली. तर नाशिकमध्येही तीन लाख 60 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. लोअर परेलच्या फिनीक्स मॉलमध्ये महापालिकेने धडक कारवाई केली. दिवसभर दंड न आकारता केवळ प्लास्टिक जमा करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लोअर परेलच्या मॉलमधील सिलेरीया, स्टार बक्स, फुड मॉल, मॅकडोनल्ड यांच्यावर धडक कारवाई केली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बंदी असलेले प्लास्टिक जप्त करण्यात आले. सिलेरीया, स्टार बक्स, फुड मॉल यांना प्रत्येकी 5000 रुपयांचा दंड आकारण्यात आला, तर मॅकडोनल्डने दंड देण्यास नकार दिल्याने प्रशासन त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार आहे. मार्केट विभागाच्या उपायुक्त संगीता हसनाळे यांनी ही कारवाई केली. सांगलीत प्लास्टिकचं एक टन साहित्य जप्त सांगलीतही प्लास्टिक बाळगणाऱ्या दुकानावर महापालिकेने छापे टाकून हजारो रुपयांचा प्लास्टिक आणि थर्माकोलचा साठा हस्तगत करून दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. महापालिकेने आपल्या 15 भरारी पथकाच्या माध्यमातून आज जवळपास 50 हजार रुपये दंड वसूल केला, तर अंदाजे एक टन प्लास्टिक पिशवी आणि अन्य प्लास्टिक जप्त केलं आहे. यामध्ये सांगली शहरात मुख्य बाजार पेठेत छापे टाकून अनेक दुकानातून प्लास्टिक तसेच थर्माकोलचे साठे जप्त करण्यात आले आहेत. प्लास्टिक विरोधी कारवाई उद्यापासून अधिक तीव्र होणार असून मंगल कार्यालये, मटण आणि चिकन मार्केट, मंडई, बाजार येथेही तपासणी करण्यात येणार आहे. संबंधित बातमी : कोणत्या महापालिका क्षेत्रात किती जणांवर कारवाई?

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis Chhat puja: छठपूजेसाठी मुख्यमंत्री जुहू चौपाटीवर; म्हणाले, देव कधीही जात, प्रांत भेदभाव करत नाही, सूर्यदेवाला नमन
छठपूजेसाठी मुख्यमंत्री जुहू चौपाटीवर; म्हणाले, देव कधीही जात, प्रांत भेदभाव करत नाही, सूर्यदेवाला नमन
छठपूजेसाठी जुहू चौपाटीवर उत्तर भारतीयांची मोठी गर्दी, पर्यटकांना प्रवेश बंदी; नाशिकच्या रामकुंडावरही उत्साह
छठपूजेसाठी जुहू चौपाटीवर उत्तर भारतीयांची मोठी गर्दी, पर्यटकांना प्रवेश बंदी; नाशिकच्या रामकुंडावरही उत्साह
Chipi Airport Sindhudurg: दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर उद्या चिपी विमानतळावर नवी मुंबईहून पहिले विमान उतरणार; सिंधुदुर्गच्या विकासाला आणि पर्यटनाला नवी भरारी मिळणार
दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर उद्या चिपी विमानतळावर नवी मुंबईहून पहिले विमान उतरणार; सिंधुदुर्गच्या विकासाला आणि पर्यटनाला नवी भरारी मिळणार
BMC News: महसूलवाढीसाठी मुंबई महापालिकेचा वरळीतील मोक्याचा भूखंड 815 कोटींच्या भाडेपट्ट्यावर देण्याचा प्रस्ताव
महसूलवाढीसाठी मुंबई महापालिकेचा वरळीतील मोक्याचा भूखंड 815 कोटींच्या भाडेपट्ट्यावर देण्याचा प्रस्ताव

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Police : मालकाने विश्वासाने सोपवलेली 28 लाखांची बॅग घेऊन कुरिअर बॉय पसार, पुणे पोलिसांचा फिल्मी स्टाईल तपास, तब्बल 10 हजार किमी पाठलाग करत मुसक्या आवळल्या
मालकाने विश्वासाने सोपवलेली 28 लाखांची बॅग घेऊन कुरिअर बॉय पसार, पुणे पोलिसांचा फिल्मी स्टाईल तपास, तब्बल 10 हजार किमी पाठलाग करत मुसक्या आवळल्या
Punjab Assembly Election : पंजाबमध्ये 'आप'साठी आनंदी आनंद? आज निवडणूक घेतल्यास भगवंत मान पुन्हा मुसंडी मारणार? सत्तावापसीसाठी काँग्रेसही शर्यतीत, ताजा सर्व्हे समोर
पंजाबमध्ये 'आप'साठी आनंदी आनंद? आज निवडणूक घेतल्यास भगवंत मान पुन्हा मुसंडी मारणार? सत्तावापसीसाठी काँग्रेसही शर्यतीत, ताजा सर्व्हे समोर
Maharashtra Farmers Farmer ID : शेतकऱ्यांनो तातडीने 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा शासकीय योजनांचे पैसे अडकणार; मदत व पुनर्वसन विभागाचे महत्त्वाचे आवाहन
शेतकऱ्यांनो तातडीने 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा शासकीय योजनांचे पैसे अडकणार; मदत व पुनर्वसन विभागाचे महत्त्वाचे आवाहन
शेगावहून दर्शन घेऊन परतताना हायवेवर भीषण अपघात; दुचाकीवरील तीन तरुण ठार, परिसरात हळहळ
शेगावहून दर्शन घेऊन परतताना हायवेवर भीषण अपघात; दुचाकीवरील तीन तरुण ठार, परिसरात हळहळ
लातूर जिल्हा बँक निवडणुकीत 99.40 टक्के मतदान; उद्या मतमोजणी, देशमुख-निलंगेकरांची प्रतिष्ठा पणाला
लातूर जिल्हा बँक निवडणुकीत 99.40 टक्के मतदान; उद्या मतमोजणी, देशमुख-निलंगेकरांची प्रतिष्ठा पणाला
Lalit Modi : आयपीएलचा संस्थापक आणि पळपुटा ललित मोदी बनला ब्रिटनचा नागरिक, फोटो शेअर करत म्हणाला 'हे नवं घर'
आयपीएलचा संस्थापक ललित मोदी बनला ब्रिटनचा नागरिक, फोटो शेअर करत म्हणाला 'हे नवं घर'
Devendra Fadnavis Chhat puja: छठपूजेसाठी मुख्यमंत्री जुहू चौपाटीवर; म्हणाले, देव कधीही जात, प्रांत भेदभाव करत नाही, सूर्यदेवाला नमन
छठपूजेसाठी मुख्यमंत्री जुहू चौपाटीवर; म्हणाले, देव कधीही जात, प्रांत भेदभाव करत नाही, सूर्यदेवाला नमन
Arrest and Criminal Case Rules : देशातील 'या' दोन व्यक्तींविरुद्ध कधीच गुन्हा दाखल होणार नाही, ना अटक करता येणार; काय आहेत त्यांचे विशेषाधिकार?
देशातील 'या' दोन व्यक्तींविरुद्ध कधीच गुन्हा दाखल होणार नाही, ना अटक करता येणार; काय आहेत त्यांचे विशेषाधिकार?
Embed widget