एक्स्प्लोर
आदित्य ठाकरेंनंतर आता तेजस ठाकरेही राजकारणात येण्याची चिन्हं
युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंपाठोपाठ ठाकरे घराण्यातली आणखी एक व्यक्ती राजकारणात येते की काय? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
मुंबई : युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंपाठोपाठ ठाकरे घराण्यातली आणखी एक व्यक्ती राजकारणात येते की काय? अशी चर्चा आता रंगू लागली आहे. कारण, उद्धव ठाकरे यांचे दुसरे चिरंजीव तेजस ठाकरे यांचा फोटो ‘सामना’ या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर छापण्यात आला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतरच्या अभिनंदनाच्या जाहिरातीत त्यांचा फोटो छापला गेला आहे. त्यामुळे या फोटोबरोरच आता तेजस ठाकरेही राजकारणात झळकतील का? अशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेने 10 पैकी 10 जागा जिंकत अभाविपचा दारुण पराभव केला. या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांची कामगिरी अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. या विजयामुळे आदित्य ठाकरे यांनी आपलं नेतृत्त्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.
पण याचवेळी तेजस ठाकरे यांचा फोटो वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर छापल्याने नव्या चर्चांना उधाण आलं आहे.
VIDEO :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
रायगड
Advertisement