Coronavirus | वरळीतील कोरोनाबाधितांची रुग्णालयात गैरसोय; आदित्य ठाकरेंकडून गंभीर दखल
वरळीतील काही कोरोनाग्रस्तांची रुग्णालयात गैरसोय होत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याची दखल पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली आहे. आदित्य यांनी ट्विट करत त्याची माहिती दिलीय.
मुंबई : वरळीमधील कोरोनाबाधितांना पोदार रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं. मात्र, याठिकाणी या रुग्णांची मोठी गैरसोय होत होती. याचाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याची दखल वरळी मतदारसंघाचे आमदार आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली. "ह्या लोकांना दुसरीकडे शिफ्ट करण्यात आले आहे. मला त्यांनी नवीन व्हिडिओज पाठवले आहेत. मी त्यांच्याशी स्वतः संपर्क साधून चूक केलेल्या व्यक्तीच्या वतीने माफी देखील मागितली. त्यांना भविष्यात कधी गरज भासल्यास संपर्क साधता यावा यासाठी मी त्यांना माझा संपर्क क्रमांक दिला आहे", असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.
वरळीतील काही भागात कोरोना विषाणूने प्रवेश केला आहे. याच कोरोना संक्रमित रुग्णांना वरळी येथील पोदार रुग्णालयात क्वॉरंटाईन करण्यात आलं होतं. मात्र, या रुग्णालयात लोकांची गैरसोय होत होती. या ठिकाणी असलेली खोली, टॉयलेट अतिशय अस्वच्छ आहे. ज्यांना क्वॉरंटाईन करण्यात आलंय ते स्वतःच झाडू मारुन साफसफाई करत आहे. एकच टॉयलेट त्यातही खिडकी बंद नाही. या सर्व प्रकारचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तो पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत पोहचल्यानंतर त्यांनी त्याची तत्काळ दखल घेतली. यासंदर्भात त्यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.
ह्या लोकांना दुसरीकडे शिफ्ट करण्यात आले आहे. मला त्यांनी नवीन व्हिडिओज पाठवले आहेत. मी त्यांच्याशी स्वतः संपर्क साधून चूक केलेल्या व्यक्तीच्या वतीने माफी देखील मागितली. त्यांना भविष्यात कधी गरज भासल्यास संपर्क साधता यावा यासाठी मी त्यांना माझा संपर्क क्रमांक दिला आहे.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 6, 2020
Coronavirus | कोरोनाच्या संकटातही भाजपची प्रचार मोहीम, मास्कवर शेलार यांचं नाव
काय म्हणाले आदित्य ठाकरे? "वरळी पोद्दार हॉस्पिटल मधून एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. काल जी गैरसोय झाली होती आणि त्यासाठी जी व्यक्ती जबाबदार होती, त्यांच्यावर कारवाई झाली आहे." ह्या लोकांना दुसरीकडे शिफ्ट करण्यात आले आहे. मला त्यांनी नवीन व्हिडिओज पाठवले आहेत. मी त्यांच्याशी स्वतः संपर्क साधून चूक केलेल्या व्यक्तीच्या वतीने माफी देखील मागितली. त्यांना भविष्यात कधी गरज भासल्यास संपर्क साधता यावा यासाठी मी त्यांना माझा संपर्क क्रमांक दिला आहे.
मुंबईतील 'कोरोना'चे हॉटस्पॉट, मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान 'मातोश्री'ही गंभीर स्थितीतील विभागात
राज्यातील आकडा वाढतोय राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वेगाने वाढताना दिसत आहे. आज घडीला राज्यात 809 रुग्णसंख्या आहे. यात मुंबईत सर्वाधिक 491 लोकांना कोरोनाची लागण झालीय. तर, आतापर्यंत 56 जण कोरोनामुक्त झाले आहे. यात सात रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. आतापर्यंत राज्यात 45 जणांचा बळी कोरोनामुळे गेला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जास्तीत जास्त लोकांची वेगाने कोरोना चाचणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी कोरोना रॅपीड टेस्ट घेण्याचेही सरकारकडून प्रयत्न आहेत.
Lockdown | 'एबीपी माझा'च्या बातमीनंतर मुंबईतील वृद्ध पांचोली दाम्पत्याला मदतीचा ओघ