एक्स्प्लोर

Coronavirus | कोरोनाच्या संकटातही भाजपची प्रचार मोहीम, मास्कवर शेलार यांचं नाव

एकीकडे सरकार, अत्यावश्यक यंत्रणा कोरोनाच्या संकटात अहोरात्र प्रयत्न करत असताना, भाजपने मात्र या परिस्थितीतही मास्क, ग्लोव्ज आणि सॅनिटायजरच्या माध्यमातून प्रचाराची संधी सोडलेली नाही.

मुंबई : एकीकडे कोरोनाचं संकट सुरु असताना भाजपने प्रचार मोहीम सुरु केली की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. भाजपच्या स्थापनादिनाचं औचित्य साधत भाजपप्रणित नवं भारतीय शिव वाहतूक संघटनेच्या वतीने मुंबईतील रिक्षाचालकांना मास्क, ग्लोव्ज आणि सॅनिटायजर वाटण्यात आलं. भाजपचे आमदार आशिष शेलार आणि रिक्षा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी अराफात शेख यांच्या हस्ते या वस्तूंचा वाटप करण्यात आलं. या मास्कवर आशिष शेलार आणि हाजी अराफात शेख यांची नावं देखील आहेत. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क लावणे, ग्लोव्ज घालणे आणि सॅनिटायजरचा वापर करणं गरजेचं आहे. मुखतः जे इतर नागरिकांच्या जास्त संपर्कात येत आहेत, त्यांनी याचं पालन करणं आवश्यक आहे. मुंबईमधील रिक्षाचालक मोठ्या प्रमाणात इतर नागरिकांच्या संपर्कात येत असतात. त्यांना आज भाजपप्रणित नवं भारतीय शिव वाहतूक संघटनेच्या वतीने मास्क, ग्लोव्ज आणि सॅनिटायजर वाटण्यात आलं. भाजपचा आज (6 एप्रिल) 40 वा स्थापना दिवस आहे. याच निमित्ताने मुंबईतील गरीब रिक्षाचालकांना भाजपचे आमदार आणि हाजी अराफात शेख यांच्या हस्ते मास्क, ग्लोव्ज आणि सॅनिटायजर वाटप करण्यात आलं. या वस्तूंचं वाटप करणं ही चांगली गोष्ट असली तरी भाजपने यातून प्रचार केल्याचं समोर आलं आहे. एकीकडे सरकार, अत्यावश्यक यंत्रणा सर्वोतोपरी मदत करत असताना, भाजपने मात्र या परिस्थितीतही मास्क, ग्लोव्ज आणि सॅनिटायजरच्या माध्यमातून प्रचाराची संधी सोडलेली नाही. Coronavirus | कोरोनाच्या संकटातही भाजपची प्रचार मोहीम, मास्कवर शेलार यांचं नाव याआधी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्तांना केलेल्या मदतीच्या वेळीही असाच प्रकार घडला होता. या मदतीची पाकिटांवर भाजपचे तत्कालीन आमदार सुरेश हळवणकर यांचा फोटो छापण्यात आला होता. कोरोनामुळे रोजगारावर परिणाम झाला आहे. गरीबांना मास्क किंवा ग्लोव्ज यासारख्या वस्तूही विकत घेता येत नाहीत. त्यामुळे रिक्षाचालकांना या वस्तूंचं वाटप करुन हा सामाजिक कार्याचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया आमदार आशिष शेलार यांनी दिली. तसंच रिक्षाचालकांना केंद्राच्या जीआरप्रमाणे राज्याने देखील पाच किलो धान्य द्यावे अशी मागणी शेलार यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Tukaram Mundhe FDA : तुमच्याकडे तलवार आहे, पण त्याने डास मारता, अधिकारांचं प्रदर्शन करता; हॉटेलवरील धाडीवरून कोर्टाने FDAला फटकारलं
तुमच्याकडे तलवार आहे, पण त्याने डास मारता, अधिकारांचं प्रदर्शन करता; हॉटेलवरील धाडीवरून कोर्टाने FDAला फटकारलं
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget