प्लास्टिकवर बंदी असतानाही प्लास्टिकचं आवरण असलेला बुके वापरला, केडीएमसी उपयुक्तांवर दंडात्मक कारवाई
प्लास्टिक बॅनची मोहिम मागील बऱ्याच काळापासून सर्वत्र राबविली जात आहे. दरम्यान आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने 2 ते 9 जानेवारी दरम्यान प्लास्टिक विरोधी मोहीम सुरू केली आहे.
![प्लास्टिकवर बंदी असतानाही प्लास्टिकचं आवरण असलेला बुके वापरला, केडीएमसी उपयुक्तांवर दंडात्मक कारवाई action taken against KDMC commissioner for using plastic bouquet in Function प्लास्टिकवर बंदी असतानाही प्लास्टिकचं आवरण असलेला बुके वापरला, केडीएमसी उपयुक्तांवर दंडात्मक कारवाई](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/03/91b303c42e8d860abda2880661b08b2f_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कल्याण : प्लास्टिक पर्यावरणासाठी अत्यंत धोकादायक असल्या मागील अनेक वर्ष प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी आणण्याची मोहिम सुरु आहे. पण आतापर्यंत याला हवं तसं यश आलं नसल्याने प्रशासन याविरोधात कारवाई करताना दिसते. दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने 2 ते 9 जानेवारी दरम्यान प्लास्टिक विरोधी मोहीम सुरू केली आहे. या दरम्यान प्लास्टिक वापरणाऱ्या नागरिकांना तसंच व्यापाऱ्यांना 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. दरम्यान एका कार्यक्रमात पालिका उपाआयुक्तांनीच प्लास्टिकचा वापर केल्याने त्यांना दंड ठोठावण्यात आला आहे.
केडीएमसी पालिका प्लास्टिक विरोधी मोहीम राबवत असल्याने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सुरक्षा विभागाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराच्या व्यासपीठावर पालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी प्लास्टिक बंदीची शपथ घेतली. यांनतर अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी प्लास्टिकचे आवरण असलेलेाच बुके दिल्याचे नजरेस पडताच पालिका उपायुक्त रामदास कोकरे यांनी त्याच व्यासपीठावरून सत्कार करणाऱ्या पालिका उपायुक्त पल्लवी भागवत यांना प्लास्टिक वापराबद्दल 5 हजाराचा दंड ठोठावला. या दंडाची पालिका वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. तर दंड ठोठावला जाताच सर्वच पालिका अधिकाऱ्याचे चेहरे पाहण्या सारखे झाले होते.
'कारवाईला घरापासूनच सुरुवात करणे गरजेचे'
तर याबाबत रामदास कोकरे यांनी आपल्या घरापासून सुरुवात करणे गरजेचे आहे. मी प्लास्टिक वापरत नाही पण ही सवय सर्व अधिकाऱ्यांना लागणे गरजेचे आहे या कार्यक्रमात वापरलेल्या बुकेला प्लास्टिकचे आवरण होते म्हणून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना 5 हजाराचा दंड ठोठावल्याचे त्यांनी सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर? एकाच आठवड्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत 181 टक्क्यांनी वाढ
- Mumbai School : मुंबईत पहिली ते नववी आणि अकरावीच्या शाळा 31जानेवारीपर्यंत बंद
- Mumbai Omicron cases: मुंबईतील कोरोनाबाधितांपैकी 80 टक्के रूग्ण ओमायक्रॉन बाधित, BMC आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांची माहिती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)