एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 15/03/2017
*एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 15/03/2017*
*एबीपी माझाच्या प्रेक्षक आणि वाचकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा!*
- मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडून कर्जमुक्तीसाठी मदत घ्यावी, उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर सेना मंत्र्यांची आग्रही मागणी, कर्जमाफीवरुन दोन्ही सभागृहात जबर गदारोळ, तर दिल्लीत शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण goo.gl/mBukUa https://goo.gl/pMNfhZ
- ‘कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांकडून कर्ज फेडण्याच्या जबाबदारीवर चुकीचा परिणाम होईल’ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला एसबीआयच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांचा विरोध https://goo.gl/UlZzCM
- लातूर, उस्मानाबाद बीडसह मराठवाड्यात गारपीटीचा धुमाकूळ, गहू, आंबा, द्राक्षांच्या बागांचं मोठं नुकसान, घरांचे पत्रेही उडाले, तर परळीत वीज पडून दोघांचा मृत्यू goo.gl/VLRkKB goo.gl/pAHvZX
- राजस्थाननंतर कोल्हापूरच्या मसाई पठारावर संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’च्या सेटवर हल्ला, जाळपोळ आणि तोडफोड करुन दहशत माजवण्याचा प्रयत्न, 16 तासानंतरही आरोपी मोकाट https://goo.gl/9paxmp
- भाजप नेत्यांचा मुंबई महापालिकेच्या 61 हजार कोटीच्या फिक्स डिपॉझिटवर डोळा, शिवसेनेचा पलटवार, तर विकासासाठी पैसा खर्च करण्याची भाजपची मागणी https://goo.gl/mOf9Gu
- गोव्यात लोकशाहीचा खून, काँग्रेस सुस्त राहिल्यानं भाजपविरोधात निवडून आलेले पक्ष भाजपच्याच घोडेबाजारात सामील, 'सामना'तून शिवसेनेची भाजपवर जोरदार टीका https://goo.gl/TQZ0re
- पुणे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा महापौर विराजमान, राष्ट्रवादीच्या नंदा लोणकर यांचा 46 मतांनी पराभव करत भाजपच्या मुक्ता टिळक महापौरपदी https://goo.gl/Orl3fC
- ‘जास्तीत जास्त भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करा आणि दोन देशांना जोडणाऱ्या शांततेचा सेतू व्हा’ यूपी निवडणुकांतील विजयानंतर पाकिस्तानी चिमुरडीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र https://goo.gl/S3NGZh
- उत्तरप्रदेशमधील गँगरेप प्रकरणी अखिलेश सरकारमधील मंत्री गायत्री प्रजापती अटकेत, प्रजापती यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी https://goo.gl/1cn27n
- इंडियन आयडॉल स्टार गायिका नाहीद आफरीनविरोधात मौलवींचा फतवा, आयसिसविरोधात गाणं गायल्यानं 46 मुल्लांकडून फतवाजारी, आसाम सरकारकडून सुरक्षेचं आश्वासन https://goo.gl/ChvND4
- मध्य प्रदेशात मुंबई एटीएसच्या कारवाईत इंजिनिअर आवेश शेखला अटक, आयसिसशी संबंध असल्याचा संशय https://goo.gl/Pbj1ME
- अलाहाबादजवळ कौशांबी येथे इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं वायूदलाचं चेतक हेलिकॉप्टर कोसळलं, सुदैवानं हेलिकॉप्टरमधील दोन्ही पायलट सुखरुप https://goo.gl/xewjmL
- ‘आईचं न ऐकता डॉक्टरऐवजी इंजिनिअरच व्हायला हवं होतं’, धुळ्यात मारहाण झालेल्या 'त्या' डॉक्टरची उद्विग्न प्रतिक्रिया https://goo.gl/Y7cftI
- सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राज्यातील महामार्गांवरील 15 हजार दारुची दुकानं बंद होणार, सरकारचा तब्बल 10 हजार कोटींचा महसूल बुडणार https://goo.gl/MTr7LY
- आयसीसी अध्यक्ष शशांक मनोहर यांचा तडकाफडकी राजीनामा, वैयक्तिक कारणांमुळे पद सोडल्याचा दावा, मनोहर यांच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा https://goo.gl/gY0lNS
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
आरोग्य
गडचिरोली
Advertisement