एक्स्प्लोर
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 30 मे 2019 | शनिवार
राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये 1. मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस, मराठवाडा-विदर्भ आणि खान्देशात हलक्या पावसाचा अंदाज, कोल्हापुरातही पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ 2. पहिल्याच पावसाने केली सरकारची पोलखोल, ठाण्यात अर्ध्या फुटानं रस्ता खचला, गोवा हायवेचीही चाळण तर विजापूर गुहागर मार्गावर चिखलाचं साम्राज्य 3.मराठा आरक्षण 16 टक्केच ठेवण्यासाठी प्रयत्न करणार, मराठा कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंचं आश्वासन, तर महाराष्ट्र क्रांती सेनेकडून मुख्यमंत्र्यांना मराठा गौरव पुरस्कार जाहीर 4. विधानसभा निवडणुकीसाठी वंचित आघाडीला सोबत घेण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरु, 3 जुलैला चर्चेची पहिली फेरी, दिल्लीत राहुल गांधींसोबत झालेल्या बैठकीत निर्णय 5. पुण्यातील संरक्षण भिंत दुर्घटनेप्रकरणी आल्कन स्टायलसच्या 2 भागीदारांना बेड्या, कोंढव्यात भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 2 चिमुकल्यांसह 13 मजुरांचा मृत्यू
6. मुंबईत पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, मध्य रेल्वेवरील माटुंगा ते मुलुंड डाऊन मार्गावरील मेगाब्लॉक रद्द 7. मुंबई महापालिका हद्दीतील बेकायदेशीर पार्किंगसाठी दहा हजारांची दंडवसुली लांबणीवर, पार्किंगची हद्द एक किमीवरुन 100 ते 500 मीटरवर येणार 8. संत तुकोबांची पालखी आज वरवंड तर ज्ञानोबांची पालखी जेजुरी मुक्कामी, भक्तीमय वातावरणात वारकऱ्यांची पंढरीच्या दिशेनं वाटचाल 9. 'बम बम भोले' जयजयकारात अमरनाथ यात्रेला सुरुवात, 15 ऑगस्टपर्यंत चालणार यात्रा, सुरक्षेची चोख व्यवस्था 10. विश्वचषकाच्या रणांगणात टीम इंडियासमोर आज यजमान इंग्लंडचं आव्हान, इंग्लंडला हरवल्यास भारतीय संघाचं उपांत्य फेरीचं तिकीट कन्फर्म आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
करमणूक
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग























