एक्स्प्लोर

राज्यातील शूरवीरांचा 'एबीपी माझा'कडून 'शौर्य' पुरस्कारानं गौरव

राज्यातील एकूण नऊ जणांना शौर्य पुरस्कारानं गौरव करण्यात येणार आहे. चार वर्षाच्या चिमुरडीचाही या शौर्य पुरस्कारामध्ये समावेश आहे. या पुरस्कार सोहळ्याला राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, लेफ्टनंट जनरल डी. बी. शेकटकर (निवृत्त), अभिनेत्री निर्मिती सावंत, मृणाल कुलकर्णी, सुमीत राघवन, सोनाली कुलकर्णी, सुनील बर्वे, दिग्दर्शक संजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

मुंबई : प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून 'एबीपी माझा'तर्फे राज्यातील शूरवीरांचा शौर्य पुरस्कारानं गौरव करण्यात आला. शौर्य पुरस्काराचं यंदाचं हे पहिलंच वर्ष आहे. सुरक्षा यंत्रणेतील आपले जवान रोजच देशाच्या रक्षणासाठी शौर्य दाखवत असतात. मात्र असे काही सामन्य व्यक्ती असतात ज्यांना कोणताही शौर्याचा वारसा नसतो. मात्र परिस्थितीनुसार संकटसमयी त्यांच्यातील शौर्य जगासमोर येतं आणि आपण चकीत होतो. अशा शूरवीरांचा सन्मान म्हणजे शौर्य पुरस्कार आहे.

राज्यातील एकूण नऊ जणांचा शौर्य पुरस्कारानं गौरव करण्यात आला. या नऊ जणांमध्ये चार वर्षाच्या चिमुरडीचाही या शौर्य पुरस्कारामध्ये समावेश आहे. या पुरस्कार सोहळ्याला राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, लेफ्टनंट जनरल डी. बी. शेकटकर (निवृत्त), अभिनेत्री निर्मिती सावंत, मृणाल कुलकर्णी, सुमीत राघवन, सोनाली कुलकर्णी, सुनील बर्वे, दिग्दर्शक संजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

एबीपी माझाने या सन्मान सोहळ्याला निमंत्रित केल्याबद्दल सुधीर मुनगंटीवर यांनी आभार मानले. इंग्रजांनी देशातून निर्जीव कोहिनूर देशातून नेला, मात्र देशात असे शूर सजीव कोहिनूर आहेत तोपर्यंत देश पुढेच जाईल, अशा शब्दात मुनगंटीवार यांनी शौर्य गाजवलेल्यांचा गौरव केला.

आजच्या जगात लोक फार स्वकेंद्रीत झाले आहेत. अशावेळी एबीपी माझाने अशा पुरस्काराने शूरवीरांचा सन्मान केला, ही कौतुकास्पद बाब असल्याचं अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी म्हटलं. तर इतर सोहळ्यांमध्ये कोण कसं दिसतं याला जास्त महत्व दिलं जातं मात्र, शौर्य पुरस्कार सोहळ्यात तुम्ही परिस्थितीनुसार कसे वागता, संकटांचा मोठ्या धाडसाने कसा सामना करता हे पहिलं जातं, असं अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाली. या अनोख्या उपक्रमाबद्दल इतर मान्यवरांनीही 'एबीपी माझा'चं कौतुक केलं.

कोण आहे 'ते' नऊ शूरवीर?

सुदर्शन शिंदे

मुंबई… कधीही न झोपणारं शहर… डिसेंबर 2017 मध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत असलेली ही नगरी कमला मिल कमाऊंडमधील आगीने स्तब्ध झाली होती. मुंबईतील पबहब म्हणून ओळख असलेल्या कमला मिल कम्पाऊंडमधील मोजो बीस्त्रो पबमध्ये आगीचा भडका उडला आणि नाचगाण्यांमध्ये रमलेल्या लोकांची जीवाच्या आकांताने धावपळ सुरु झाली. अपुरी जागा, आग शमवण्याच्या साधनांची कमतरता या सर्व कारणांमुळे अनेक निष्पाप लोक आगीत होरपळत होती. अशा या कठीण प्रसंगात स्वताच्या जीवाची पर्वा न करता, आगीत अडकलेल्या लोकांचे प्राण वाचवणारा देवदूत ठरले पोलिस कर्मचारी सुदर्शन शिंदे. अग्निशमन दल आणि इतर बचाव दलातील अधिकाऱ्यांना मदतीचा हात देत अनेक जणांना खांद्यावर टाकून त्यांनी बाहेर काढलं. यावेळी नऊ जणांचे प्राण वाचवण्यात सुदर्शन शिंदे यांना यश मिळालं.

रुपाली मेश्राम

वाघ समोर बघताच सर्वसामान्य माणूस पळ काढल्याशिवाय राहाणार नाही, परंतू भंडाऱ्यातील रुपाली मेश्राम या तरुणीने घरात शिरलेल्या वाघाशी मोठ्या हिंमतीने दोन हात केले. रात्रीच्या सुमारास रुपालीच्या घरात वाघ शिरला. अंगणात बांधलेल्या शेळीवर त्यानं हल्ला केला होता. शेळीच्या आवाजानं रुपाली आणि तिची आई अंगणात आली. मात्र याचवेळी बेसावध असलेल्या दोघींवर वाघानं हल्ला चढवला. रुपालीनं प्रसंगावधान दाखवून काठीने वाघाला हुसकावून लावलं. अखेर रुपालीच्या हल्लापुढे वागानं माघार घेतली आणि जंगलात धुम ठोकली.

सुनिता पाटील

मुंबईच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असणारं मुंबई अग्निशमन दल. आग म्हटलं की आतापर्यंत आपण जीवाची बाजी लावणारे अग्शिमन दलातील पुरुष अधिकारी पाहिलेत. मात्र प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालणाऱ्या महिला या आगीच्या वर्दीतही मागे पडल्या नाहीत. अग्निशिखा म्हणून अग्निशमन दलात आपलं कर्तव्य बजावण्यासाठी महिला सज्ज झाल्या. त्यापैकीच एक सुनीता पाटील. 22 ऑगस्ट 2018 ला परळच्या क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आगीत त्यांनी तब्बल 13 जणांचा जीव वाचवलाय. स्वतःच्या जीवापेक्षा इतरांचा जीव कसा वाचवायचा या ध्येयानेच त्यांनी हि कामगिरी बजावली. सुनिता यांनी शारीरिक आणि मानसिक अडथळ्यांना बाजूला सारत अनेकांचे प्राण वाचवले.

चंद्रशेखर सावंत

3 जुलै 2018 चा तो दिवस, लोकलच्या वेळापत्रकावर चालणारा मुंबईकर नेहमी सारखाचा धावत होता. नेहमी सारखीच गर्दीच्या लोकल ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता. पण पुढे काय वाढून ठेवलंय याची कल्पनाही कोणाला नव्हती. वेळापत्रकाप्रमाणे गर्दीच्या वेळी बोरीवली ते चर्चगेट लोकल अंधेरी स्थानकात आली. काही जण उतरले तर काही चढले. नेहमी सारखेच लोकलने अंधेरी स्थानक सोडलं आणि मोटरमन चंद्रशेखर सावंत यांच्या डोळ्या देखत अंधेरी आणि विलेपार्लेच्या मधला रुळांवरुन जाणाऱ्या गोखले पुलाचा काही भाग धाडकन खाली कोसळला. समोरचं दृश्य पाहाताच भानावर येऊन चंद्रशेखर सावंत यांनी प्रसंगावधान दाखवत इमर्जन्सी ब्रेक मारत लोकल थांबवली. त्यांनी मारलेल्या एका ब्रेकमुळे अनेकांचे प्राण वाचवले आणि एक मोठी दुर्घटना टळली.

स्नेहल शिरोटे

बहीण-भावाच्या नात्याविषयी आपल्याला अनेक गोष्टी माहिती असतील. पण सांगलीच्या स्नेहलने धाडसाने भावावर आलेला काळ परतवून लावला. सांगलीत वसगडे येथे राहणारं शिरोटे कुटुंब. सुनिल शिरोटेंना स्नेहल आणि सुजल ही दोन मुलं. रविवारी सकाळी स्नेहल आणि सुजल अंगणात खेळत होते. खेळता-खेळता सुजल अंगणातील पाण्याच्या टाकीजवळ गेला. पाण्याच्या टाकीत वाकून पाहत असताना त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात पडणार इतक्यात स्नेहल तेथे गेली. सुजल पाण्यात पडत असतानाच स्नेहलने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेतं तिने जिवाच्या आकांताने आरडाओरडा केला. तोच घरातील मंडळी बाहेर धावत आली. तात्काळ त्यांनी सुजलला पाण्यातून बाहेर काढले. स्नेहलच्या प्रसंगावधानामुळे तिच्या दोन वर्षीय भावाचे प्राण वाचले. स्नेहलचं वय अवघं चार वर्ष, पण तिने दाखवलेली सतर्कता, तत्परता, धाडस आणि बुद्धीकौशल्य थक्क करणारं आहे. मोठ्या माणसांना अशा प्रसंगात बऱ्याचदा सुचत नाही अशा वेळी तिने दाखवलेली समयसूचकता खरंचं कौतुकास्पद आहे.

नीलम गायकवाड

28 सप्टेंबर 2018… मुळा-मुठा नदीचा कालवा फुटल्याने पुण्यात पूरस्थिती निर्माण झालेली. पाण्याचा प्रचंड प्रवाह आणि मदतीसाठी दोरी पकडून उभे असलेले नागरिक, अशा परिस्थितीत पाण्याच्या वेगवान प्रवाहातून किमान 7 ते 8 नागरिकांचे जीव वाचवण्याची धुरा कर्तव्यदक्ष पोलीस हवालदार नीलम गायकवाड यांनी सांभाळली. आपात्कालीन परिस्थितीत स्वत:चा जीव धोक्यात घालून, मातृत्वाची जाण ठेवत झाशीच्या राणीसारखे पाण्याच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्या एका लहान मुलाला पाठीवर घेतलं आणि पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काढलं.

सिद्धू हुमानाबडे

वय वर्ष 20, काम - स्विगीची पार्सल पोहोचवणं आणि आता खास ओळख करुन द्यायची झालीच तर मदतीसाठी तत्पर असा तरुण. कामगार रुग्णालयात आगीचा भडका उडाला असताना त्या परिसरात सिद्धू पार्सल डिलिव्हरी करण्यासाठी गेला होता. रुग्णालयाजवळून धूर येत असल्याचं दिसल्यानं तो तातडीनं बचावकार्यात सहभागी झाला. रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावर अग्निशमन दलाच्या जवानासोबत सिद्धूनं स्वत:लाही बचावकार्यात झोकून दिलं. अग्निशमन दलाच्या शिडीचा वापर करुन त्यानं दगडाच्या सहाय्यानं रुग्णालयाची काच फोडली. आणि खिडकीच्या कठड्यावरुन आत शिरून लोकापर्यंत पोहचून त्यांना बाहेर काढलं. बचावकार्य करत असताना धुराचं साम्राज्य इतकं पसरलं होतं की त्याला काहीच दिसत नव्हतं आणि श्वास घेण्यासही त्रास होत होता. मात्र तरीही प्राणपणाने सिद्धूने आपलं कार्य केलं. सिद्धूच्या प्रसंगावधानामुळं तब्बल 10 जणांचा जीव वाचला.

सुनील कुमार नापा

नायगाव रेल्वे स्टेशन… प्लॅटफाॅर्म क्रमांक 2.. वेळ रात्री 9 वाजताची… सात वर्षाचा एक मुलगा आईसोबत स्टेशनवर येतो.. ट्रेन थांबली असताना दोघांनी ट्रेनमध्ये चढण्याचं ठरवतात.. आई तर ट्रेनमध्ये चढते, मात्र मुलगा आत चढेपर्यंत ट्रेन सुरू होत आणि ट्रेनमध्ये चढणाऱ्या त्या मुलाचा पाय घसरतो. मुलगा ट्रेन आणि प्लॅटफाॅर्मच्या मध्ये पडणार इचक्यातच आऱपीएफ जवान त्या मुलाकडे धावत येतो आणि त्याला खेचतो. आऱपीएफ जवान जणू त्या चिमुकल्यासाठी सुपरहिरो म्हणून येतो. या सुपर हिरोचं नाव आहे सुनील कुमार नापा. क्षणार्धात होत्यात नव्हतं झालं असतं पण या परिस्थितीत कर्तव्यदक्ष राहून सुनील यांनी आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

क्लीनअप मार्शल पथक, मुंबई

मुंबईचा समुद्र अनेकांना मोहित करतो. आपला वेळ व्यतित करण्यासाठी समुद्र किनारा ही हक्काची जागा. मात्र समुद्राचा आनंद लुटण्याच्या नादात काहीजण वाहवत जातात. 30 ऑगस्ट 2018 च्या दुपारी अशीच घटना घडली. दीपिका परमार मुलांना घेऊन भावासोबत वांद्रे बॅण्डस्टॅण्ड समुद्र किनारी आल्या होत्या. दीपिका खडकावर बसून सेल्फी काढत असताना जोरात लाट येऊन आदळली. त्यामुळे तोल जाऊन त्या समुद्रात पडल्या. समुद्राच्या लाटा त्यांना आत खेचू लागल्या, त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी आणि इतरांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरु केला. तेव्हा तिथे तैनात असलेल्या अशोक घाग आणि दीनेश अवारी या क्लीनअप मार्शल्सचे लक्ष त्यांच्याकडे गेले. या दोघांनी थेट समुद्रात उडी मारुन दीपिकांना वाचवले तर तानाजी ढावरे, आदेश घाग आणि महेश मालप यांनी दीपिकांना बाहेर काढण्यासाठी मदत केली. क्लीनअप मार्शल्सनी आपला जीव धोक्यात घालून दीपिकांचे प्राण वाचवले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरेTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 20 Jan 2025 : ABP Majha : 5 PMABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 06 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Embed widget