एक्स्प्लोर
'माझा'चा 10 फुटी महामोदक सिद्धिविनायक चरणी
मुंबई: बाप्पा माझा महामोदक स्पर्धेतला महामोदक आज सिद्धिविनायका चरणी अर्पण केला जाणार आहे. तबब्ल 10 फुटी महामोदक बाप्पाला अर्पण करण्यापूर्वी प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला आहे.
प्रभादेवीच्या रविंद्र नाट्यमंदिरात या महामोदकाचं उद्घाटन करण्यात आलं. या सोहळ्यानिमित्त आज दिवसभर सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे.
यामध्ये भजन, ढोलवंदना, गणेशवंदना, सेल्फीकट्टा, हास्यमेळावा, अथर्वशीर्षपठण, शास्त्रीयसंगीत तसंच पारंपरिक नृत्याचाही कार्यक्रम यावेळी होणार आहे.
बाप्पा माझा महामोदक स्पर्धा मुंबई, पुणे, नाशिक या शहरांत घेण्यात आली. या तिन्ही जिल्ह्यातील स्पर्धकांनी शेफ विष्णू मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली 10 फुटी महामोदक बनवला.
संध्याकाळी या महामोदकाची मिरवणूक काढत तो सिद्धिविनायकाला अर्पण केला जाईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement