एक्स्प्लोर
Advertisement
खडसेंच्या राजीनाम्यासाठी 'आप' नेत्या प्रीती मेनन घेणार मुख्यमंत्र्याची भेट
मुंबई: 'आप'च्या नेत्या प्रिती मेनन या आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्याच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत. आज रात्री साडे आठ वाजता मुख्यमंत्र्यानी मेनन यांना भेटीची वेळ दिली आहे.
वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याची तसेच सध्याच्या लाचखोरीच्या प्रकरणात निपक्ष, जलद चौकशीची त्या मागणी करणार आहेत.
दरम्यान, महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी तक्रारदार रमेश जाधव यांना विकृत म्हणत गजानन पाटलाची पाठराखण केली होती. तर आपण गंमत म्हणून जाधव यांच्याकडे 30 कोटीची मागितले होते असं जबाब गजानन पाटील यांनी एसीबीकडे नोंदवला होता.
काय आहे गजानन पाटील लाचखोरी प्रकरण?
राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा खासगी पीए असल्याचं सांगणाऱ्या गजमल पाटील उर्फ गजानन पाटील, याला 30 कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी शनिवारी अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंत्रालयात त्याला अटक केली.
ठाण्यातील मागासवर्गीयांच्या शिक्षण संस्थेला जमीन हस्तांतरित करण्यासठी गजानन पाटीलने संस्थेच्या विश्वस्तांकडे तब्बल 30 कोटींची लाच मागितली होती. यानंतर संस्थेचे ट्रस्टी डॉ. रमेश जाधव यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या प्रकरणी तक्रार नोंदवली होती. त्यावर कारवाई करत एसीबीने गजानन पाटीलला मंत्रालयात अटक केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement