एक्स्प्लोर
...तर रस्त्यावर उतरु, ‘आम्ही गिरगावकर’ MMRDA विरोधात आक्रमक
एमएमआरडीएकडून सॉईल टेस्टिंगचे काम आहे, म्हणून नागरिकांनीही आतापर्यंत सहकार्य केले. मात्र ता दोन-चार दिवस उलटल्यानंतरही तिथून मशीन हलवल्या गेल्या नाहीत. तसेच, बॅरिगेट्सही तिथेच पडून आहेत.

मुंबई : सॉईल टेस्टिंगच्या नावाखाली दोन-चार दिवसांपासून रस्त्यावरच मोठ-मोठ्या मशिन ठेवल्याने वाहतूक कोंडी होत असल्याने, ‘आम्ही गिरगावकर’ संस्था आक्रमक झाली आहे. एमएमआरडीएविरोधात आंदोलन करण्याचा इशारा ‘आम्ही गिरगावकर’ने दिला आहे.
सॉईल टेस्टिंगचं काम सुरु असल्याचे कारण पुढे करत, गेल्या अनेक दिवसांपासून ठाकूरद्वार सत्कार हॉटेल शेजारी बॅरिगेट्स आणि मशीन लावून काम सुरु आहे. त्यामुळे बॅरिगेट्समुळे रस्ता अडवला जातो आहे. त्यामुळे गिरगावात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते आहे. याचा त्रास वाहनचालकांसह नागरिकांनाही सहन करावा लागतो आहे.
एमएमआरडीएकडून सॉईल टेस्टिंगचे काम आहे, म्हणून नागरिकांनीही आतापर्यंत सहकार्य केले. मात्र ता दोन-चार दिवस उलटल्यानंतरही तिथून मशीन हलवल्या गेल्या नाहीत. तसेच, बॅरिगेट्सही तिथेच पडून आहेत.
गिरगांवकरांचा अंत पाहू नका. जर काम झालंय, तर दोन दिवसांमध्ये बॅरिगेट्स काढा, नाहीतर आंदोलन करु, असे ‘आम्ही गिरगावकर’ संस्थेने म्हटले आहे. तसेच, एमएमआरडीएविरोधात रस्त्यावर उतरण्याचाही इशाराही देण्यात आला आहे.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement
























