एक्स्प्लोर
Advertisement
मुंबईकरांनो सावधान! सरबतातील बर्फाचे 81 टक्के नमुने दूषित, महापालिकेचा अहवाल
ऐन उन्हाळ्यात त्यामुळे थंड पेयं पिण्याच्या नादात तुम्ही रोगराईला आमंत्रण देत नाही ना याची खबरदारी घेणं मुंबईकरांसाठी गरजेचं झालं आहे.
मुंबई : उन्हाळा असल्यामुळे शरीराला थंडावा मिळवण्यासाठी अनेक जण रस्त्यावरील ज्यूस किंवा बर्फाच्या गोळ्याचा पर्याय निवडतात. मात्र, या सरबतांमधला बर्फ तुमच्या शरीरासाठी अपायकारक ठरु शकतो. कारण मुंबईरांच्या सरबत, सरबत, ज्यूस आणि थंड पेयात वापरले जाणारे बर्फाचे 81 टक्के नमुने दूषित असल्याचं आढळून आलं आहे. एप्रिल महिन्यात महापालिका प्रशासनाने केलेल्या कारवाईच्या अहवालात ही बाब समोर आली आहे.
ऐन उन्हाळ्यात त्यामुळे थंड पेयं पिण्याच्या नादात तुम्ही रोगराईला आमंत्रण देत नाही ना याची खबरदारी घेणं मुंबईकरांसाठी गरजेचं झालं आहे.
कुर्ला रेल्वे स्थानकात दूषित सरबत विकत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यावर महापालिका प्रशासनाने सरबत, ऊसाचा रस आणि बर्फगोळा विक्रेत्यांवर धडक कारवाई सुरू केली होती. एप्रिल महिन्यात करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल आता समोर आला आहे. या अहवालात तब्बल 81 टक्के नमुने दूषित आढळले आहेत. यामुळे सरबत, ऊसाचा रस आणि बर्फगोळा खाणाऱ्या मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
VIDEO | रेल्वे स्थानकांवर लिंबू सरबत पिणाऱ्यांनो सावधान
काही दिवसांपूर्वी कुर्ल्यात हार्बर रेल्वे मार्गावरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 7 आणि 8 वर असलेल्या खाद्य पदार्थाच्या स्टॉलवर अतिशय घाणेरड्या पद्धतीने लिंबू सरबत बनवत असल्याचं समोर आलं होतं. या स्टॉलच्या छतावर कामगार लिंबू सरबत बनवत होता. यानंतर त्याने सरबतामध्येच हात धुतले. कुर्ला रेल्वे स्थानकावरील पुलाचे पत्रे काढल्याने एका प्रवाशाच्या ही बाब निदर्शनास आली. त्याने हा प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आणि त्याची रेल्वेकडे तक्रारही केली. तसंच सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला होता.
मार्चमधील कारवाई -
बर्फाच्या 156 नमुन्यांपैकी 141 नमुने अयोग्य
लिंबू सरबतच्या 204 नमुन्यांपैकी 157 नमुने अयोग्य
उसाचा रसाच्या 236 नमुन्यांपैकी 221 नमुने अयोग्य
एप्रिलमधील कारवाई -
बर्फाच्या 385 नमुन्यांपैकी 300 नमुने अयोग्य
लिंबू सरबतच्या 280 नमुन्यांपैकी 218 नमुने अयोग्य
उसाचा रसाच्या 303 नमुन्यांपैकी 268 नमुने अयोग्य
VIDEO | रेल्वे स्टेशनवरील अन्नपदार्थांच्या खाचेत उंदीर, वांद्रे स्थानकावरील प्रकार | मुंबई | एबीपी माझा
संबंधित बातम्या
रेल्वे स्थानकावर गलिच्छ पद्धतीने लिंबू सरबत बनवतानाचा व्हिडीओ व्हायरल
वांद्रे स्टेशनवर अन्नपदार्थांमध्ये उंदीर, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्टॉलधारकाला दंड
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भविष्य
क्राईम
निवडणूक
Advertisement