एक्स्प्लोर
मुंबईत विचित्र अपघात, 7 गाड्या एकमेकांवर आदळल्या
मुंबईच्या विक्रोळीमध्ये आज एका विचित्र अपघातामध्ये तब्बल 7 गाड्यांचं नुकसान झालं.

मुंबई : मुंबईच्या विक्रोळीमध्ये आज एका विचित्र अपघातामध्ये तब्बल 7 गाड्यांचं नुकसान झालं. पूर्व द्रुतगती महामार्गावर दुपारी 2 वाजता कन्नमवारनगरच्या जवळपास हा अपघात झाला. एका भरधाव गाडीने अचानक ब्रेक लावल्याने त्यामागून येणाऱ्या 7 गाड्यांनी एकामागोमाग एक धडक दिली. अर्थात या अपघातामध्ये सुदैवाने कुणीही जखमी झालं नाही, पण गाड्यांचं मात्र नुकसान झालं. अपघात कुणाच्या चुकीमुळे झाला, याचा शोध अद्याप लागलेला नाही. शिवाय कुणी जखमी झालं आहे का, याचीही माहिती मिळालेली नाही. मात्र या विचित्र अपघातामध्ये गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शिवाय यामुळे वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागला. पाहा व्हिडीओ :
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक























