एक्स्प्लोर
नवी मुंबईत 7 स्कूल बसना आग
महत्वाचं म्हणजे आज रविवार असल्याने मुलांना शाळेत जाण्यासाठी बसचा वापर झाला नाही. त्यामुळे मोठा अनर्थ झाला असता.

नवी मुंबई : नवी मुंबईतील करावे गावाजवळील उभ्या असलेल्या 7 स्कूल बसना आग लागली होती. पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान अचानक एका बसमध्ये स्फोट झाल्याने आग लागली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीत एक-एक करत एकत्र उभ्या असलेल्या 7 स्कूल बस जाळून खाक झाल्या. बसमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वेळीच आग विझवल्याने करावे गावापर्यंत पोहचली नाही. या सर्व बस ज्ञानदीप शाळेच्या आहेत. महत्वाचं म्हणजे आज रविवार असल्याने मुलांना शाळेत जाण्यासाठी बसचा वापर झाला नाही. त्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला.
आणखी वाचा























