नवी मुंबईतील 363 कोटी रूपयांचे हेरॅाईन जप्त प्रकरण ATSकडे! आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचा संशय
Navi Mumbai Drugs Case : नवी मुंबई पोलिसांकडून (Navi Mumbai Police) गेल्या महिन्यात तब्बल 363 कोटी रूपयांचे हेरॅाईन जप्त (Heroin) करण्यात आलं होतं.
Navi Mumbai Drugs Case : नवी मुंबई पोलिसांकडून (Navi Mumbai Police) गेल्या महिन्यात तब्बल 363 कोटी रूपयांचे हेरॅाईन जप्त (Heroin) करण्यात आलं होतं. दुबई येथून कंटेनरमधून आलेले हेरॅाईन जप्त करत मोठी कारवाई केली होती. यामध्ये पंजाब पोलीसांकडून नवी मुंबई पोलीसांना मदत करण्यात आली होती. हे प्रकरण आता महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक (ATS) कडे वर्ग करण्यात आले आहे. या प्रकरणाची आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याने आता प्रकरणाचा पुढील तपास महाराष्ट्र एटीएस करणार आहे.
नवी मुंबई पोलिसांकडून पनवेलमधील आजिवली गावात असलेल्या नवकार लॉजिस्टिकच्या कंटेनर फ्रेट स्टेशनमध्ये ही कारवाई करण्यात आली होती. क्राईम ब्रॅंचची मोठी कारवाई करत कोट्यवधीचं हेरॉईन जप्त केलं होतं. 27 डिसेंबर 2021 रोजी दुबईवरून कंटेनर जेएनपीटी बंदरात आला होता. तब्बल सहा महिन्यांपासून पडून असलेल्या कंटेनरमधून नवी मुंबई पोलिसांनी 362.59 कोटी रुपयांचे 72.5 किलो हेरॉईन जप्त केले होते.
हे प्रकरण गंभीर असल्यानं आता महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक (ATS) कडे वर्ग करण्यात आले आहे. या प्रकरणाची आंतरराष्ट्रीय लिंक असल्याने आता या प्रकरणाचा पुढील तपास महाराष्ट्र एटीएस करणार आहे.
महिनाभरातच हे प्रकरण दहशतवाद विरोधी पथकाकडे वर्ग करण्याचे आदेश महाराष्ट्र पोलीस महासंचालकांनी शुक्रवारी जारी केले. एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने या माहितीला दुजोरा दिला आणि सांगितले की, आदेशाचे पालन करून नवी मुंबई पोलिसांनी केस पेपर्सही एटीएसकडे सोपवले आहेत.
नवी मुंबईत उरण तालुक्यातील जेएनपीटी बंदरात गेल्या वर्षी देखील मोठी कारवाई करण्यात आली होती. बंदरात आयात करण्यात आलेल्या कंटेनरमध्ये सुमारे 879 कोटी रुपयांचं हेरॉईन जप्त करण्यात आलं होतं. डीआरआयने केलेल्या कारवाईमध्ये इराणमार्गे आलेल्या कंटेनरमधून या हेरॉईनची तस्करी करण्यात आल्याचं उघड झालं होतं. आता गेल्या महिन्यात केलेल्या कारवाईचं देखील आंतरराष्ट्रीय कनेक्शन तपासलं जाणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
उरणमधील जेएनपीटी बंदरातून आयात करण्यात आलेलं सुमारे 879 कोटींचं हेरॉईन जप्त
Navi Mumbai : नवी मुंबई पोलिसांकडून 363 कोटी रुपयांचे हिरॉईन जप्त ABP Majha