एक्स्प्लोर

उरणमधील जेएनपीटी बंदरातून आयात करण्यात आलेलं सुमारे 879 कोटींचं हेरॉईन जप्त

जेएनपीटी येथे आलेल्या कंटेनरमधील मालाची तपासणी केली असता त्यामध्ये सुमारे 293 किलो हेरॉईन असल्याचे आढळून आले. या संपूर्ण मालाची किंमत ही सुमारे 879 कोटी रुपये असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

रायगड : रायगड जिल्ह्यातल्या उरण तालुक्यातील जेएनपीटी बंदरातून आयात करण्यात आलेल्या कंटेनरमध्ये सुमारे 879 कोटी रुपयांचं हेरॉईन जप्त करण्यात आलं आहे. डीआरआयने केलेल्या कारवाईमध्ये इराणमार्गे आलेल्या कंटेनरमधून या हेरॉईनची तस्करी करण्यात आल्याचं उघड झालं आहे. 

मुंबईजवळच्या जेएनपीटी बंदरातून आयात-निर्यातीचा व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. त्यातच शुक्रवारी करण्यात आलेल्या कारवाईमध्ये अफगाणिस्तानहून इराणमार्गे जेएनपीटी बंदरात आलेल्या कंटेनरची तपासणी करण्यात आली. डीआरआयमार्फत या संशयित कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये तुरटी आणि तोंडाला लावण्याची पावडर असे सामान असल्याचे नमूद करण्यात आले होते. परंतु, डीआरआयला मिळालेल्या माहितीनुसार या सामानाची तपासणी केली असता यामध्ये ड्रग्ज असल्याचा संशय आला होता.  

यामुळे, एनडीपीएस किटच्या मदतीने या मालाची तपासणी केली असता त्यामध्ये हेरॉईन असल्याची खात्री झाली. यामुळे या कंटेनरमधील मालाची तपासणी केली असता त्यामध्ये सुमारे 293 किलो हेरॉईन असल्याचे आढळून आले असून या संपूर्ण मालाची किंमत ही सुमारे 879 कोटी रुपये असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात, या कंटेनरचा आयातदार याला देखील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तर डीआरआयमार्फत याप्रकरणी आणखी संशयितांचा शोध घेतला जात आहे. .

दरम्यान जेएनपीटी बंदरातून आयात करण्यात आलेला हा कंटेनर पंजाबला पाठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर गेल्यावर्षी देखील डीआरआयने केलेल्या कारवाईमध्ये सुमारे 191 किलो हेरॉइन जप्त करण्यात आले असून शुक्रवारी जप्त करण्यात आलेला 293 किलोचा साठा हा गेल्या दहा वर्षातील सर्वात मोठा साठा असण्याची शक्यता आहे. दरम्यान, जेएनपीटी बंदरातून सुरु असलेल्या आयात-निर्यातीच्या व्यवसायातून अनेक वेळा रक्तचंदन, सोने, बंदुक, ड्रग्ज अशा मालाची तस्करी करण्यात येत असल्याचं सीआययू, एसआययू आणि डीआरआय यांनी केलेल्या कारवाईत समोर आलं असून या तस्करीमध्ये मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO

मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत

''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका

मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले

स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली

लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले

Embed widget