एक्स्प्लोर
विसर्जन मिरवणुकीमधील किरकोळ वादातून दाम्पत्यावर हल्ला
कल्याण: दोन दिवसांपूर्वी कल्याणच्या बेतुरकर पाड्यातील वयोवृद्ध दाम्पत्यावर हल्ला करणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीतील वाद्यांच्या आवाजाच्या कारणावरुन झालेल्या वादातून हा हल्ला करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती समजते आहे.
या प्रकरणी 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून दोनी आरोपींचा सध्या शोध सुरु आहे. कृष्णा एकनाथ वाघे, सुरेश उर्फ भुऱ्या रमेश वाघे आणि गोरखनाथ वाघे अशी तीन आरोपींची नावं आहेत.
12 सप्टेंबरला बेतुरकर दाम्पत्य अंगणात झोपले असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. ज्यात लहू बेतूरकर यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर पत्नी जया बेतुरकर या गंभीर जखमी झाल्या आहेत.
संबंधित बातम्या:
कल्याणमध्ये वृद्ध दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला, वृद्धाचा मृत्यू
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement