एक्स्प्लोर
Advertisement
पक्षविरोधी कारवाई करणाऱ्या 26 शिवसैनिकांची पक्षातून हकालपट्टी
मुंबई : बंडखोरीनंतर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्यांना सहानुभूती मिळू नये, म्हणून शिवसेनेनं चांगलीच कंबर कसली आहे. शिवसेनेचे पदाधिकारी असलेल्या मुंबईतल्या 26 शिवसैनिकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
प्रभादेवीतून अपक्ष लढणारे महेश सावंत, घाटकोपरचे माजी विभागप्रमुख सुधीर मोरे, दशरथ शिर्के, माजी नगरसेविका शुभांगी शिर्के यांचा 26 जणांमध्ये समावेश आहे. कारवाई झालेल्या 26 जणांपैकी 6 ते 7 जण शिवसेनेसाठी त्या-त्या प्रभागात महत्वाचे पदाधिकारी होते.
निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांना शिवसेनेकडून समजावण्याचा प्रयत्न झाला. मात्र पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तुम्ही कितीही मोठे पदाधिकारी असलात तरी गय केली जाणार नाही, हा संदेश देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.
मुंबईसह दहा महापालिकांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर 23 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे महापालिकांवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement