एक्स्प्लोर
Advertisement
26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याला 11 वर्ष, शहीदांना आदरांजली
26 नोव्हेंबर 2008 हा मुंबईसाठी काळा दिवस... 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात जवळपास 166 लोक मृत्यूमुखी पडले होते, तर 300 पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते.
मुंबई : 26 नोव्हेंबर 2008 हा दिवस मुंबईसाठी काळा दिवस ठरला होता. समुद्रमार्गाने आलेल्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मुंबईला वेठीस धरलं होतं. आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात त्या दिवसाच्या जखमा ओल्या आहेत. या घटनेला आज 11 वर्ष पूर्ण झाली आहेत. आज संपूर्ण देश दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करत आहे. या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात जवळपास 166 लोक मृत्यूमुखी पडले होते, तर 300 पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते.
26 नोव्हेंबर 2008मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मुंबईच्या ताज हॉटेलसोबतच इतर 6 ठिकाणांवर हल्ला केला होता. या हल्ल्याज जवळपास 166 लोकांचा मृत्यू झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवर सर्वात जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. तर ताज हॉटेलमध्ये 31 लोकांचा मृत्यू झाला होता.
मुंबई ATS चीफ हेमंत करकरे शहीद झाले होते
26 नोव्हेंबर 2008 रोजी जवळपास 60 तास दहशतवाद्यांनी मुंबईला वेठीस धरलं होतं. पण अचानक झालेल्या या हल्लावर नियंत्रण मिळवत एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात पोलिसांना यश आलं होतं. मुंबईची दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटका करताना अनेक पोलिसांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. त्यांपैकी एक होते, एटीएस चीफ हेमंत करकरे. ज्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावून दहशतवाद्यांचा सामना केला. करकेर आपल्या घरी 9:45 वाजता जेवत असतानाच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवर काही आतंकवादी शिरल्याची माहिती त्यांना मिळाली. ते ड्रायव्हर आणि बॉडीगार्डसोबत त्वरित सीएसटीसाठी रवाना झाले. तिथे पोहोचल्यानंतर दहशतवाद्यांना शोधण्यासाठी स्टेशनवर गेले. परंतु, त्यावेळी तिथे कोणीच नव्हतं. तिथून लगेच करकेर कामा हॉस्पिटलमध्ये पोहोचले. त्यादरम्यान, सेंट जेव्हियर्स कॉलेज जवळील एका अरुंद रस्त्यावर दहशतवाद्यांनी एके-47 ने त्यांच्यावर हल्ला केला. त्यामध्ये हेमंत करकरे, अशोक कामटे शहीद झाले. याव्यतिरिक्त विजय साळस्कर, कॉन्सेबल संतोष जाधव आणि तुकाराम ओंबळे यांच्यासह अनेक पोलीसांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.
दहशतवादी कसाबला फाशी
मुंबईला वेठीस धरणाऱ्या सर्व दहशतवाद्यांपैकी फक्त एकाच दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आलं होतं, त्याचं नाव अजमल मोहम्मद कसाब. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी एके-47 आणि ग्रेनेडने मुंबईवर हल्ला केला होता. मुंबई पोलिसांनी प्राणांची बाजी लावून एका दहशतवाद्याला जिवंत पकडलं होतं. 3 महिन्यांमध्ये त्याच्यावरील आरोप सिद्ध झाले. तसेच एक वर्षानंतर या हल्ल्यात सहभागी असणाऱ्या डेव्हिड कोलमॅन हेडली यानेही 18 मार्च 2010 रोजी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर 21 नोव्हेंबर 2012 रोजी कसाबला फाशी देण्यात आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
राजकारण
निवडणूक
निवडणूक
Advertisement