एक्स्प्लोर

26 कोटीची व्हेल माशाची उलटी केली हस्तगत , पाच जणांना अटक; वन विभागाची मोठी कारवाई

व्हेल माशाच्या उलटीला भारतात सोबतच विदेशातही मोठी मागणी आहे. भारतात व्हेल माशाच्या उलटीसाठी एक किलोसाठी 1 कोटी रुपये भाव आहे.

ठाणे :  ठाणे वनविभाग पथकाने एक मोठी धडक कारवाई केली आहे. व्हेल माशाची 26 कोटी रुपये किमतीची उलटी विक्रीसाठी आणल्याची खबर खबऱ्या मार्फत वनविभागाचे अधिकारी यांना मिळाली होती. त्याची शहानिशा करून वनविभागाच्या पथकाने कोट्यवधींची व्हेल माशाची उलटी हस्तगत करून तस्कर माफियांना धक्काच दिला. ही तस्करी करणाऱ्या पाच माफियांना वन विभागाने अटक केली आहे.

कोट्यवधींची व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी येणार अशी माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार वनविभागाच्या पथकाने धडक कारवाईसाठी आपले खबऱ्यांचे नेटवर्क पसरविले. अखेर मिळालेल्या माहितीनुसार वनविभागाच्या पथकाने मुंबईच्या मालाड आणि अंधेरी परिसरातून व्हेल माशाची उलटी तस्करी करण्यापूर्वीच पाच जणांना बेड्या ठोकल्या. 

स्पर्म व्हेल या अतिशय दुर्मिळ आणि खोल समुद्रात असलेल्या वेल माशाच्या उलटीचा हा भाग असतो. जवळपास एक वर्षांपेक्षा जास्त कालावधी या उलटीला समुद्रकिनाऱ्यावर येण्यास लागतो. विशेष म्हणजे वेल माशाची ही उलटी समुद्राच्या पाण्यात बुडत नसून समुद्रातील असलेल्या क्षार मुळे समुद्राच्या खाऱ्या पाण्यावर तरंगते आणि गोळा होऊन वर्षभराचा प्रवास करून समुद्रकिनाऱ्यावर येते.    

भारतापेक्षा विदेशात मोठी मागणी 

व्हेल माशाच्या उलटीला भारतात सोबतच विदेशातही मोठी मागणी आहे. भारतात व्हेल माशाच्या उलटीसाठी एक किलोसाठी 1 कोटी रुपये भाव आहे. तर परदेशात एका किलोसाठी आंतरराष्ट्रीय बाजारात या उलटीची किंमत प्रति किलो 3 ते 4  कोटी एवढी आहे. व्हेल माशाच्या उलटीचा मोठा उपयोग होतो. त्यामुळॆच या उलटीला मोठी किंमत प्राप्त झाल्याची माहिती वनविभागाचे उप वन संरक्षक गजेंद्र हिरे यांनी दिली.  

अतिउच्च प्रतीच्या सुगंधी द्रव्यासाठी होतो उपयोग 

व्हेल माशाच्या उलटीचा वापर हा भारतात आणि विदेशात अतिउच्च प्रगतीच्या सुगंधी द्रव्य, परफ्युम बनविण्यासाठी होतो. सुगंधी अगरबत्तीतही या व्हेल माशाच्या उलटीचा वापर होतो. तर उलटीमुळे परफ्युमचा सुगंध हा खूप काळ टिकतो. व्हेल माशाच्या एक किलो उलटीमध्ये तब्बल दहा हजार लिटर महागडे अत्तर परफ्युम, रोजच्या वापरातील सेंट तयार करण्यात येते. तर या उलटीतून बाजारात एक किलोमध्ये हजारो कोटीची उलाढाल होते. त्यामुळे उलटीला मोठी किंमत आहे. 

उलटी किंवा व्हेल माशाचा भाग बाळगणे शिक्षेस पात्र  

हजारो कोटींची उयलाढाल बाजारात करणाऱ्या व्हेल माशाच्या उलटी किंवा व्हेल माशाचा कुठलाही भाग जवळ बाळगणे हे वन कायद्यानुसार गुन्हा असून तो शिक्षेस पात्र आहे. सदर प्रकरणी जामीनपात्र गुन्हा दाखल करून दोषी आढळल्यास किमान तीन वर्ष आणि कमाल 7 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा या कायद्यांतर्गत तरतूद असल्याची माहितीही उप वन संरक्षक गजेंद्र हिरे यांनी सांगितले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News : गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
Aditya Sarpotdar Kakuda Movie Trailer : रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस; 14 बंधारे पाण्याखाली, पंचगंगा नदीची पाणी पातळी 21 फूट 11 इंचांवर
कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस; 14 बंधारे पाण्याखाली, पंचगंगा नदीची पाणी पातळी 21 फूट 11 इंचांवर
Beed News: परळीतील गोळीबार प्रकरणी अजित पवार गट आक्रमक, आमदार रोहित पवारांविरोधात कारवाई करण्याची मागणी
परळीतील गोळीबार प्रकरणी अजित पवार गट आक्रमक, आमदार रोहित पवारांविरोधात कारवाईची मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nutritious Food Pregnant Women : गर्भवती माता पोषण आहारात साप; सखोल चौकशीची मागणी9 Second News : 9 सेकंदात बातमी राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP MajhaNawab Malik In NCP : नवाब मलिक राष्ट्रवादीच्या बैठकीत, फडणवीसांना पटणार? ABP MajhaBhole Baba Hathras : हाथरस दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला; 121 जणांचा जीव गेला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News : गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
Aditya Sarpotdar Kakuda Movie Trailer : रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस; 14 बंधारे पाण्याखाली, पंचगंगा नदीची पाणी पातळी 21 फूट 11 इंचांवर
कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस; 14 बंधारे पाण्याखाली, पंचगंगा नदीची पाणी पातळी 21 फूट 11 इंचांवर
Beed News: परळीतील गोळीबार प्रकरणी अजित पवार गट आक्रमक, आमदार रोहित पवारांविरोधात कारवाई करण्याची मागणी
परळीतील गोळीबार प्रकरणी अजित पवार गट आक्रमक, आमदार रोहित पवारांविरोधात कारवाईची मागणी
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
Monalisa Net Worth : कधी दिवसरात्र काम करून कमवायची 120 रुपये, 'ही' अभिनेत्री आहे कोट्यधीश...
कधी दिवसरात्र काम करून कमवायची 120 रुपये, 'ही' अभिनेत्री आहे कोट्यधीश...
Shatrughan Sinha :  रुग्णालयात दाखल का व्हावे लागलं?  शत्रुघ्न सिन्हांनी सांगितले कारण, सोनाक्षीच्या लग्नावर सोडलं मौन
रुग्णालयात दाखल का व्हावे लागलं? शत्रुघ्न सिन्हांनी सांगितले कारण, सोनाक्षीच्या लग्नावर सोडलं मौन
Deepika Padukone : 'मॉम टू बी' दीपिका पदुकोणची पती रणवीरसह मुव्ही डेट, पाहा फोटो
'मॉम टू बी' दीपिका पदुकोणची पती रणवीरसह मुव्ही डेट, पाहा फोटो
Embed widget