एक्स्प्लोर
1993 बॉम्बस्फोटातील दोषींना लवकरच शिक्षा सुनावणार
1993 साखळी बॉम्बस्फोटातील दोषींना कधी शिक्षा सुनवायची याचा निर्णय 22 ऑगस्टला घेतला जाणार आहे.
मुंबई : 1993 साखळी बॉम्बस्फोटातील दोषींना कधी शिक्षा सुनवायची याचा निर्णय 22 ऑगस्टला घेतला जाणार आहे. कुख्यात गँगस्टार अबू सालेमला न्यायालय काय शिक्षा सुनावणार याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल.
दरम्यान पोर्तुगाल सरकारशी झालेल्या करारानुसार सालेमला फाशी न देता जन्मठेपेची शिक्षा सुनवावी अशी मागणी सीबीआयनं केली आहे. तर ताहिर मर्चंट, फिरोज खान, करीमुल्ला खान या दोषींसाठी फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यात आली असून, रियाज सिद्दीकाला जन्मठेप देण्याची मागणी सीबीआयनं केली आहे.
कोर्टानं दोषी ठरवलेल्या मुस्तफा डोसाचा शिक्षा सुनावण्याआधीच मृत्यू झाला आहे तर सातव्या आरोपीला कोर्टानं निर्दोष मुक्त केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement