एक्स्प्लोर

मुंबई लोकलवर दगडफेकीच्या 118 घटना, 113 प्रवासी जखमी, जीआरपीने केवळ 21 प्रकरणं सोडवली

मुंबईची 'लाईफलाईन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलवर दगडफेक करणाऱ्यांमुळे मुंबईकरांची 'लाईफ' धोक्यात आली आहे.

मुंबई : मुंबईची 'लाईफलाईन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलवर दगडफेक करणाऱ्यांमुळे मुंबईकरांची 'लाईफ' धोक्यात आली आहे. दररोज सुमारे एक कोटीहून अधिक प्रवासी मुंबई लोकलमधून प्रवास करतात. त्यामुळे लोकलमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे प्रवाशांना जीव धोक्यात घालून रेल्वेच्या दरवाजात उभे राहून प्रवास करावा लागतो. परंतु काही समाजकंटक अधून-मधून लोकलवर दगडफेक करतात. त्यामध्ये प्रवासी गंभीर जखमी होतात. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. परंतु या समाजकंटकांना आळा घालण्यात रेल्वे प्रशासन अपयशी ठरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 2013 ते जून 2019 या साडेसहा वर्षांच्या कालावधीत मुंबईतील रेल्वेगाड्यांवरील दगडफेकीच्या एकूण 118 घटना समोर आल्या आहेत. या घटनांमध्ये तब्बल 113 प्रवासी जखमी झाले असल्याचे माहिती अधिकार कायद्यातून पुढे आले आहे. या 118 घटनांपैकी केवळ 21 प्रकरणे सोडविण्यात जीआरपीला यश मिळाले असून 20 आरोपींना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे दगडफेकीच्या बहुतेक घटना मध्य रेल्वे मार्गावर घडल्या आहेत. कर्जत ते सीएसएमटीदरम्यान झालेल्या एकूण 84 दगडफेकीच्या घटनांमध्ये एकूण 81 प्रवासी जखमी झाले आहेत. रेल्वे प्रोटेक्शन फोर्सकडून (आरपीएफ) दगडफेकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. ज्या ठिकाणी दगड मारण्याच्या घटना जास्त आहेत, तिथे सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. दगडफेकीच्या घटनांची आकडेवारी 2013 साली 16 दगडफेकीचे गुन्हे दाखल झाले होते. यात 3 गुन्ह्यांची उकल करण्यात आली, 3 आरोपींना अटक झाली. 2014 साली दगडफेकीचे 21 गुन्हे दाखल झाले होते. त्यामध्ये 4 गुन्ह्यांची उकल करण्यात आली, 4 आरोपींना अटक झाली 2015 साली दगडफेकीचे 16 गुन्हे दाखल झाले होते. यात केवळ एका गुन्ह्यांची उकल करण्यात आली त्यामध्ये एका आरोपीला अटक झाली. 2016 साली दगडफेकीचे 12 गुन्हे दाखल झाले होते. यात 9 गुन्ह्यांची उकल करण्यात आली आणि एका आरोपीला अटक झाली. 2017 साली दगडफेकीचे 15 गुन्हे दाखल झाले होते. यात 4 गुन्ह्यांची उकल करण्यात आली, 3 आरोपींना अटक झाली. 2018 साली दगडफेकीचे 27 गुन्हे दाखल झाले होते. त्यामध्ये ४ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आणि 4 आरोपींना अटक झाली. जून 2019 पर्यंत दगडफेकीचे 11 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये 4 गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून केवळ 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Pangri Walmik Karad :वाल्मिक कराडला 7 दिवस कोठडी;कराड आरोपींच्या संपर्कात असल्याचा दावाZero hour on Pune | महापालिकेचे महामुद्दे | पुणे टेकड्यांवर चोरी,मारहाण,अत्याचाराचे प्रकार वाढलेZero Hour On Walmik Karad : वाल्मिक कराडला कोठडी, पांगरीत निदर्शन; SIT नं कोर्टात काय सांगितलं?Zero Hour Full :  कराडवर मकोका अंतर्गत हत्येचा आरोप, कोर्टात काय घडलं ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Embed widget