एक्स्प्लोर
Advertisement
अंबरनाथमध्ये सहा महिन्यांपासून मिळतंय दहा रुपयात पोटभर जेवण
शिवसेनेच्या जाहीरनाम्यात उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात दहा रुपयात जेवण देण्याची योजना सुरु करणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र या योजनेचं रोल मॉडेल अंबरनाथमध्ये सहा महिन्यांपासून सुरु आहे.
मुंबई : शिवसेनेच्या जाहीरनाम्यात उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात दहा रुपयात जेवण देण्याची योजना सुरु करणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र या योजनेचं रोल मॉडेल अंबरनाथमध्ये सहा महिन्यांपासून सुरू आहे. या संकल्पनेला चांगला मोठा प्रतिसाद मिळतोय.
शिवसेनेनं आजच आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. ज्यामध्ये दहा रुपयात जेवण आणि एक रुपयात वैद्यकीय उपचार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. दहा रुपयात जेवण म्हटलं, की दर्जा कसा असेल इथपासून ते दहा रुपयात काय मिळणार? असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडले आहेत. मात्र याचं उत्तर अंबरनाथला गेल्यावर मिळेल. कारण अंबरनाथमध्ये या योजनेचं रोल मॉडेल तब्बल सहा महिन्यांपासून सुरू आहे आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळतोय.
ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि अंबरनाथचे शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर या तिघांच्या संकल्पनेतून अंबरनाथमध्ये 1 मे रोजी दहा रुपयात जेवण ही संकल्पना सुरु करण्यात आली. या जेवणात वरण, भात, भाजी, पोळी आणि एक गोड पदार्थ असं जेवण दहा रुपयात दिलं जातं, ते सुद्धा अनलिमिटेड.
खरोखरच हे जेवण दहा रुपयात परवडतं का? याबाबत अरविंद वाळेकर यांना विचारलं असता त्यांनी सांगितले की, हे जेवण प्रत्यक्षात 20 रुपयांना पडतं. रोजचा एकूण खर्च हा जवळपास अडीच हजारांच्या घरात जातो. धान्यासोबतच गॅस, जेवण तयार करणारे स्वयंपाकी, जेवण वाढणारे लोक, भांडी घासणाऱ्या महिला यांचा पगारही यात धरला जातो. मात्र दानशूर व्यक्तींच्या देणग्या आणि प्रसंगी खिशातून पैसे टाकून हा खर्च भागवला जात असल्याचे वाळेकर यांनी सांगितले.
हे जेवण अवघ्या 10 रुपयात मिळत असलं, तरी त्याच्या दर्जात कुठेही कमी पडू दिलं जात नाही. चांगल्या प्रतीचं धान्य वापरून अतिशय स्वच्छ ठिकाणी ते शिजवलं जातं. शिवाय टेबल खुर्च्या लावून व्यवस्थित बसून जेवण्याची व्यवस्थाही याठिकाणी करण्यात आली आहे. त्यामुळं अंबरनाथमधले गोरगरीब लोक, मजूर आणि कामगार वर्ग, रिक्षाचालक हे नेहमीच इथे जेवण्यासाठी येतात.
व्हिडीओ पाहा
फक्त जेवणच नव्हे, तर श्रीकांत शिंदे फाऊंडेशनकडून इथे प्रायोगिक तत्वावर दहा रुपयांत वैद्यकीय उपचारही सुरू करण्यात आले आहेत. या दोन्ही रोल मॉडेल्सना सर्वसामान्य लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच आता राज्यभरात हे प्रकल्प राबवले जाणार आहेत. राज्यातही त्यांचं स्वागतच होईल, यात शंका नाही. कारण शेवटी भुकेपेक्षा मोठं काहीच नसतं..!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement