Sanjay Raut : भाजपनं शब्द पाळला असता तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते; खासदार संजय राऊतांचा दावा, सगळंच सांगितलं...
Sanjay Raut : भाजपने 50-50चा दिलेला शब्द पाळला असतातर शिंदेच तेव्हा मुख्यमंत्री झाले असते. असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती. मात्र त्यावेळी महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) एका प्रमुख नेत्याने सांगितलं एकनाथ शिंदे फार जुनियर आहेत. त्यांच्या हाताखाली आम्ही काम करणार नाही. म्हणून एकनाथ शिंदे त्यांच्या बाबतीत विचार होऊ शकला नाही, हे मी वारंवार सांगितले आहे. एकनाथ शिंदे विधिमंडळ नेते झाले होते. पण महाविकास आघाडीत आज जे त्यांच्याबरोबर बसलेले आहेत ते अजित पवार आणि इतर सहकारी, तसेच दिल्लीमध्ये ज्यांनी त्यांचा नुकताच सत्कार केला ते शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्वत: विरोध दर्शवला. या सर्वांची भूमिका होती एक मेसेंजर आम्हाला चालणार नाही.
एकनाथ शिंदे फार ज्युनिअर आहेत, त्याच्या हाताखाली आमचे वरिष्ठ नेते काम करणार नाही. असे मत अनेक नेत्यांचे होते. त्यांनी जर शब्द पाळला असता 50-50चा तर शिंदेच तेव्हा मुख्यमंत्री झाले असते. असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. त्यावेळी मुख्यमंत्री पदासाठी इतर कुठले नाव पुढे आणण्याचा प्रश्नच येत नव्हता. उद्धव ठाकरे त्या बाबतीत प्रामाणिक आहेत. मात्र भारतीय जनता पक्षाने आपला शब्द पाळला नाही. अशी टीका ही त्यांनी केली आहे.
रोज उठून तुम्ही दिल्लीला उठाबशा काढत आहात
विधानसभेमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने निवडणूक आयोग, पैसा आणि यंत्रणेचा वापर केला त्याच्यामुळे ती झाकी आहे. या शिवाय त्यांनी वेगळं काही आणले आहे का? तुम्ही आज ज्यांच्या दावणीला धनुष्यबाण बांधलेला आहे, चोरलेला आहे ते काही योग्य आहे का? रोज उठून तुम्ही दिल्लीला उठाबशा काढत आहात. त्या बाळासाहेब ठाकरे यांना, माननीय शिवसेनाप्रमुखांना मान्य आहे का? त्यांना आत्मचिंतनाची गरज आहे. अशी टीका ही खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. त्यांना जर आत्मचिंतनाला कुठे जायचं असेल तर कामाख्या मंदिर किंवा अन्या कुठे जायचं असेल तर त्यांनी जावं आणि आत्मचिंतन करावं. आपण मूळ शिवसेनेबाबत जे विधान करतो ते किती तथ्य आणि सत्य आहे, हे तपासावं. असेही ते म्हणाले.
एकनाथ शिंदे स्वतः 'त्या' निर्णयामध्ये सहभागी होते- संजय राऊत
काँग्रेसच्या दावणीला शिवसेना कधीच कोणी बांधली नाही. भारतीय जनता पक्षाने आज जे बसले आहेत त्यांच्याबरोबर त्यांनी शब्द पाळला नाही. त्यांनी बेइमानी केली आणि त्या निर्णयामध्ये स्वतः एकनाथ शिंदे सहभागी होते. हा सामुदायिक निर्णय होता. त्यांचे मत फक्त त्यांना कोणते खाते मिळत आहे याच्यावर होतं, असेही संजय राऊत म्हणाले.
हे ही वाचा






















