एक्स्प्लोर
सातबारा आधार कार्डशी जोडण्याबाबतचं व्हायरल पत्र बोगस, केंद्राचं स्पष्टीकरण
![सातबारा आधार कार्डशी जोडण्याबाबतचं व्हायरल पत्र बोगस, केंद्राचं स्पष्टीकरण Modi Governmets Decision About Land Record Linking To Aadhar सातबारा आधार कार्डशी जोडण्याबाबतचं व्हायरल पत्र बोगस, केंद्राचं स्पष्टीकरण](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/24123040/aadhar-card-13.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
फाईल फोटो
नवी दिल्ली : बँक खातं आणि पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने आता जमिनीचा सातबारादेखील आधार कार्डशी लिंक करणं बंधनकारक करणार असल्याची बातमी आज दिवसभर एका पत्राच्या हवाल्याने व्हॉट्सअपवर व्हायरल झाली होती, मात्र हे पत्र बोगस असल्याचं स्पष्ट झालं आहे.
पीआयबीचे महासंचालक आणि केंद्र सरकारचे प्रधान प्रवक्ते फ्रँक नरोन्हा यांनी आपल्या ट्वीटमधून सोशल मीडियावर व्हायरल झालेलं ते पत्र बोगस असल्याचं स्पष्ट केलं आहे. केंद्राने या बोगसगिरीची चौकशीही सुरू केली आहे.
या पत्रात राजमुद्रेचाही वापर करण्यात आला असल्यानं याकडे गांभीर्यानं पाहिलं जात आहे. दरम्यान, या बोगस पत्राप्रकरणी सरकारनं पोलिसात तक्रार केली असून सध्या पोलीस याबाबत कसून चौकशी करत आहेत.
हेच ते बोगस पत्र
Clarification regarding Fake Letter on #Aadhaar attributed to Cabinet Secretariat: https://t.co/4ZgqlR5Yoe pic.twitter.com/X0WOu35ZA2
— PIB India (@PIB_India) June 19, 2017
![सातबारा आधार कार्डशी जोडण्याबाबतचं व्हायरल पत्र बोगस, केंद्राचं स्पष्टीकरण](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/19145028/5a5f9361-427b-45f9-9419-ed896df1623a.jpg)
The letter attributed to Cabinet Secretariat on #Aadhaar linking to Land records,is completely fake & mischievous pic.twitter.com/qbk6TsyiII — Frank Noronha (@DG_PIB) June 19, 2017काय म्हटलं होतं या बोगस पत्रात? - केंद्र सरकारने आता जमिनीचा सातबारादेखील आधार कार्डशी लिंक करणं बंधनकारक करणार आहे. असं या पत्रात म्हटलं होतं. -तसेच यासंदर्भात सर्व राज्यांना आदेश देण्यात आले असून, याची लवकरच अंमलबजावणी सुरु होणार आहे. असं या बोगस पत्रात म्हटलं आहे. मात्र, असं कोणतंही पत्र सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलं नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
राजकारण
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)