एक्स्प्लोर
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पोस्टाने घरपोच, 'म्होरक्या'च्या दिग्दर्शकाने पोस्टमनचे केले आदरातिथ्य
65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या वेळी पुरस्कार न स्वीकारणाऱ्यांमध्ये अमर देवकर हे आघाडीवर होते. विशेष म्हणजे देवकर यांचा म्होरक्या हा पहिलाच चित्रपट असून त्यांच्या या चित्रपटाला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार न स्वीकारल्याने त्यांना हे पुरस्कार अखेर पोस्टाने घरपोच मिळाले.
![राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पोस्टाने घरपोच, 'म्होरक्या'च्या दिग्दर्शकाने पोस्टमनचे केले आदरातिथ्य National Film Awards Post by Home, Mhorkya director felicitated Postman राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पोस्टाने घरपोच, 'म्होरक्या'च्या दिग्दर्शकाने पोस्टमनचे केले आदरातिथ्य](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/11/21191343/p1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: गेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावेळी देशातील अनेक दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार नाकारले होते. राष्ट्रपतींऐवजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुरस्कार देणार हे कळल्यानंतर अनेक लोकांनी हे पुरस्कार त्यावेळी नाकारले होते. त्या सर्वांना भारत सरकारने पोस्टाने पुरस्कार पाठवून दिले आहेत.
काल हे राष्ट्रपती पदक म्होरक्या चित्रपटाचे दिग्दर्शक अमर देवकर यांना पोस्टाने मिळाले आहे. पुरस्कार घेऊन घरी आलेल्या पोस्टमनचा दिग्दर्शक अमर देवकर यांनी भरपोशाख देऊन सत्कार केला. दिग्दर्शकाच्या या अनोख्या भूमिकेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या वेळी पुरस्कार न स्वीकारणाऱ्यांमध्ये अमर देवकर हे आघाडीवर होते. विशेष म्हणजे देवकर यांचा म्होरक्या हा पहिलाच चित्रपट असून त्यांच्या या चित्रपटाला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार न स्वीकारल्याने त्यांना हे पुरस्कार अखेर पोस्टाने घरपोच मिळाले. यावेळी त्यांनी पोस्टमन राहुल पवार यांचा भरपोशाख देऊन सन्मान केला.
आपला सन्मान कळत-नकळत करणाऱ्या पोस्टमनच्या शुभेच्छांमुळे त्याचा भरपोषाख देऊन सन्मान करणं माझ्या पाहुणचाराचा भाग होता, असं अमर देवकर यांनी सांगितले. आपल्या सर्वांचा लाडका म्होरक्या लवकरच आपल्या भेटीला येत आहे, असेही देवकर यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.
भारतातील हा पुरस्कार सर्वोच्च असून त्याचा सन्मान हा सर्व भारतीय नागरिकांचा सन्मान आहे. तो पाळण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. भारतीय समाजवादी-लोकशाहीच्या पहिल्या 'राज्यकर्त्या' या स्तंभाबद्दल भाष्य करणारा म्होरक्या गणतंत्र मानणाऱ्या सर्वांना समर्पित असून 2019 च्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रभर सर्वांसाठी प्रदर्शित होईल, असेही देवकर म्हणाले.
दोन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त म्होरक्या चित्रपटाला गोवा येथे सुरु असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात डावलले गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राज्य सरकारच्या राज्य चित्रपट पुरस्कारात देखील म्होरक्याला स्थान मिळाले नव्हते, मात्र या सोहळ्यात म्होरक्या चित्रपटाचा विशेष सन्मान केला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सांगली
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)