एक्स्प्लोर

Mark Zuckerberg | अॅपलच्या iOS 14 प्रायव्हसी बदलाचा फायदा फेसबुकलाच; मार्क झुकरबर्गचा दावा

Facebook vs. Apple : अॅपलमधील iOS 14 च्या प्रायव्हसी बदलावरुन फेसबुक (Facebook ) आणि अॅपल (Apple) आमने-सामने आले आहेत. अॅपलच्या या पॉलिसीचा फटका फेसबुकला बसणार असल्याची चर्चा असताना मार्क झुकरबर्गने (Mark Zuckerberg)  मात्र हे फेटाळून लावलंय. 

Facebook vs. Apple : अॅपलच्या iOS 14 मध्ये करण्यात येणाऱ्या प्रायव्हसी बदलाचा फायदा हा फेसबुकलाच होणार असून आम्ही या बाबतीत 'चांगल्या स्थितीत' असल्याचा दावा फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्गने केला आहे. गेल्या काही दिवसापासून फेसबुक आणि अॅपलमध्ये प्रायव्हसी पॉलिसीवरुन वाद रंगला आहे.

मार्क झुकरबर्गला एका कार्यक्रमात अॅपलच्या iOS 14 मध्ये करण्यात येणाऱ्या प्रायव्हसी बदलाबाबत विचारलं असता तो म्हणाला की, "अॅपलने त्याच्या iOS 14 मध्ये काही प्रायव्हसी बदल केले आहेत. त्याचा फायदा फेसबुकला होणार आहे. यामुळे जगातल्या अनेक कंपन्या त्यांचा व्यापार आणि व्यवहार करण्यासाठी फेसबुकच्या प्लॅटफॉर्मचा वापर करतील. कारण या कंपन्यांना अॅपलच्या नव्या पॉलिसीमुळे त्यांच्या ग्राहकांचा डेटा शोधणं आणि त्याचा वापर करणं अवघड होणार आहे." 

लहान  व्यावसायिकांच्या व्यवहारावर लक्ष केंद्रीत करणे आणि त्यांच्या व्यवहारांना अपडेट्स करण्यावर फेसबुक काम करतंय असंही मार्क झुकरबर्गनं सांगितलं.

फेसबुक आणि अॅपलचा वाद गेल्या काही दिवसापासून सुरु आहे. आपल्या युजर्सना त्यांच्या डेटावर अधिक नियंत्रण मिळावं, त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या डेटाचा वापर कोणी करु नये आणि त्यामध्ये अधिक पारदर्शकता असावी यासाठी अॅपलने त्याच्या iOS 14 मध्ये काही बदल केले आहेत. त्यामुळे फेसबुकला आता युजर्सच्या परवानगीशिवाय त्यांचा डेटा वापरता येणार नाही. त्यावरून फेसबुकने अॅपलवर टीका केली होती. 

यूजर्सचा डेटा गोळा करुन त्याचा फायदा जाहिरातींसाठी करणाऱ्या फेसबुकवर अॅपलने या आधी अनेकवेळा टीका केली आहे. अॅपलने त्यांच्या यूजर्सच्या खासगी डेटाचा दुरुपयोग होऊ नये म्हणून एक खास फिचर आणलं आहे. याचा परिणाम थेट फेसबुकच्या महसुलावर होणार असल्याने फेसबुकने त्यावर नाराजी व्यक्त केली होती.

WhatsApp Instagram Down: व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम तब्बल 40 मिनिटं डाऊन; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

या आधी अॅपलने एक नवीन फिचर iOS 14 मार्केटमध्ये आणणार असल्याची घोषणा केली होती. यूजर्सचा खासगी डेटा अधिक सुरक्षित रहावा हा या फिचरचा उद्देश आहे. त्यानुसार फेसबुक बरोबरच इतर कोणत्याही अॅपला आता अॅपलमधील डेटा वापरण्यापूर्वी यूजर्सची परवानगी घ्यावी लागणार आहे. फेसबुक हे व्हॉट्स अप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून अशा प्रकारे यूजर्सचा डेटाचा त्यांना न विचारता वापर करते, त्या डेटाच्या माध्यमातून यूजर्सवर जाहिरातींचा मारा करते आणि त्या माध्यमातून बक्कळ महसूल कमवते असा फेसबुकवर नेहमीच आरोप होतोय.

फेसबुक गोपनीयतेचा भंग करते
अॅपलचा महसूल हा जाहिरातींवर अवलंबून नाही. तो त्यांच्या अॅप स्टोअर आणि डिव्हाइस प्रोडक्टच्या माध्यमातून येतो. फेसबुकचा महसूल त्याच्या जाहिरातींवर अवलंबून आहे. त्यामुळे या कंपनीकडून यूजर्सचा मोठ्या प्रमाणावर खासगी डेटा गोळा केला जातोय. त्याला अॅपलने अनेकदा आक्षेप घेतलाय. फेसबुक आपल्या यूजर्सच्या गोपनियतेशी खेळत असल्याचं अॅपलने या आधीही आरोप केले आहेत.

फेसबुक केवळ त्यांच्या अॅपच्या माध्यमातून यूजर्सचा डेटा गोळा करत असतं तर ठिक आहे, पण फेसबुक फोन, कॉम्यूटर्स, टीव्ही आणि इतर माध्यमातून डेटा गोळा करतो यावर अॅपलचा आक्षेप आहे. तसेच फेसबुक आपल्या यूजर्सना विचारता, त्यांची परवानगी न घेता डेटा वापरते असाही आरोप अॅपलने या आधी केलाय.

फेसबुकने अॅपलच्या या नवीन फिचरवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे छोट्या व्यावसायिकांचं हित धोक्यात येण्याची शक्यता आहे असं फेसबुकनं म्हटलं आहे.

अॅपलचं मत या विरुध्द आहे. आपल्यासाठी आपल्या यूजर्सचा खासगी डेटा महत्वाचा आहे. वेगवेगळे अॅप आणि वेबसाइटवरुन त्यांचा खासगी डेटा कशा प्रकारे एकत्रित केला जातो आणि त्याचा वापर कशा पध्दतीनं करण्यात येतोय हे यूजर्सला माहित हवं असं अॅपलंने स्पष्ट केलंय.

iOS 14 मधील नव्या 'अॅप ट्रॅकिंग ट्रान्स्पेरंसी' मुळे फेसबुकला आता यूजर्सना ट्रॅक करणे आणि टारगेटेड जाहिराती करणे सहज शक्य होणार नाही. तसं करायचं असेल तर फेसबुकला पहिल्यांदा यूजर्सची परवानगी घेणं आवश्यक आहे.

Facebook Data Theft: फेसबुक डेटा चोरी प्रकरणात CBI ने केला गुन्हा दाखल, केंब्रिज अॅनालिटिकावर गंभीर आरोप

एबीपी माझामध्ये गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत, सध्या असोसिएट प्रोड्युसर. ब्रेकिंग, राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाच्या बातम्यांचा अनुभव. राजकीय आणि सामाजिक विश्लेषणात्मक बातम्यांवर भर. राज्यशास्त्र आणि इतिहास विषयांचा अभ्यासक.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार

व्हिडीओ

Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Indigo Crisis : इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार? A टू Z जाणून घ्या
इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget