WhatsApp Instagram Down: व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम तब्बल 40 मिनिटं डाऊन; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
WhatsApp Instagram Down: व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम तब्बल 40 मिनिटं डाऊन; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
WhatsApp Instagram Down: शुक्रवारी रात्री व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम वापरकर्त्यांना सुमारे 40 मिनिटे त्रास सहन करावा लागला. रात्री अकराच्या सुमारास बर्याच व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांनी मेसेज पाठविण्यात आणि प्राप्त करण्यात अडचणी येत असल्याची तक्रार केली. ही समस्या सुमारे 11:40 पर्यंत कायम राहिली. वापरकर्त्यांना व्हॉट्सअॅपला सिस्टमशी जोडण्यातही अडचण आली. यानंतर, वापरकर्त्यांनी ट्विटरवर याबद्दल तक्रार करत मीम्स शेअर केले. व्हॉट्सअॅप डाऊन असा ट्वीटर ट्रेंडही तयार झाला.
इन्स्टाग्राम वापरकर्त्यांनाही अशाच प्रकारे त्रास झाला. अनेकांना नवीन पोस्ट करण्यासह पोस्ट पाहण्यास अडचणी आल्या. यानंतर व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम डाऊन (WhatsApp Down) हा ट्विटरवर ट्रेंड करण्यास सुरवात झाली.व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम का डाऊन झाले हे अद्याप अस्पष्ट आहे. कंपनीकडून अजूनही कोणती माहिती समोर आली नाही.
After Checking Whatsapp & Instagram is Down
— Siva Harsha (@SivaHarsha_1) March 19, 2021
But Twitter is alive😂😜#whatsappdown #instagramdown pic.twitter.com/y1GBtiSN08
When Instagram & WhatsApp crashes, the people of Twitter: #instagramdown #whatsappdown pic.twitter.com/XMNr4OTK7j
— ThisisJenny🔥 (@jenny_thisis) March 19, 2021