एक्स्प्लोर

Malegaon Bomb Blast Case : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा उद्या निकाल लागण्याची शक्यता; तब्बल 17 वर्षानंतरही 'त्या ' घटनेच्या आठवणी आजही ताज्या

Malegaon Bomb Blast Case : मालेगाव शहर हादरवणाऱ्या 29 सप्टेंबर 2008 सालच्या त्या भीषण बॉम्बस्फोटाला आज जवळपास 17 वर्षं पूर्ण होत आहेत. या प्रकरणाचा निकाल एनआयए या विशेष न्यायालयात उद्या लागणार आहे.

Malegaon Bomb Blast Case : मालेगाव शहर हादरवणाऱ्या 29 सप्टेंबर 2008 सालच्या त्या भीषण बॉम्बस्फोटाला आज जवळपास 17 वर्षं पूर्ण होत आहेत. भिक्खू चौकात झालेल्या या स्फोटात 6 निरपराध नागरिकांचे प्राण गेले. तर 100 हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते. बॉम्बस्फोटाच्या या घटनेनंतर अनेक कुटुंबं उध्वस्त झाली होती. आता, तब्बल 17 वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल मुंबईच्या एनआयए या विशेष न्यायालयात उद्या ( दि.31 ) लागणार आहे. या पार्श्वभूमीवर, ज्यांनी या स्फोटात आपल्या जवळच्यांना गमावलं त्यांच्या डोळ्यांत आजही आसवं आहेत. हमे इन्साफ मिलेगा, न्याय होगा..असे म्हणत त्यांच्या भेदरलेल्या आशाळभूत नजरा निकालाच्या प्रतीक्षेत आहे.

'ती' चिमुरडी वडापाव आणण्यासाठी गेली ती परत आलीच नाही....

मालेगाव शहराला हादरवणाऱ्या या बॉम्बस्फोटात त्यांनी आपली 10 वर्षीय चिमुरडी गमावली. भिक्खू चौकात ती चिमुरडी पाववडा आणण्यासाठी गेली ती परत आलीच नाही. बॉम्बस्फोट झाला हे कळलं पण आपली मुलगी घरी परत येईल अशी आशा लियाकत शेख या बापाला होती. मात्र थोड्याच वेळात दुसरा निरोप आला की, मुलगी फरहिन त्यात मृत्युमुखी पडली. वडील म्हणून पत्नीसह मी तिथे बघायला गेलो, मात्र मला मुलीला पाहू दिले नाही. त्या चिमुरडीचा एक छोटासा गोंडस फोटो हृदयाजवळ ठेवत आजही तिची आठवण काढणाऱ्या बापाला 'इन्साफ ' मिळेल आणि ज्यांनी म्हणून हा बॉम्बस्फोट घडवून आणला त्यांना सजा होईल, अशी अपेक्षा आज त्यांना आहे.

वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्यांवर कडक कारवाई व्हावी

असेच एक या अपघातातील पीडित ट्रॅव्हल चालक शेख रफिक शेख मुस्तफा हे मुंबईला जायला निघाले होते. भिक्खू चौकात त्यांनी चहा घेतला अन् पान खावून मुंबईच्या दिशेने ते रवाना होणार होते. मात्र तेवढ्यात धमाका झाला अन् त्यांना आपला जीव गमवावा लागला. घटनेनंतर वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांचे कात्रण व फोटो दाखवत त्यांचे सासरे असलेले शेख इब्राहिम यांनी ही घटना सांगितली. हे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. जावई आणि मुलगी आम्हा वृद्ध सासू सासऱ्यांना सांभाळत होते. बॉम्बस्फोटाच्या घटनेत त्यांचा मृत्यू झाल्यानंतर आमचे खुप हाल झाले. त्यानंतर आमचा नातू आता आम्हाला सांभाळत आहे. पण जावयाच्या मृत्यूनंतर जो त्रास आम्हाला झाला तो त्रास बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्यांना झाला पाहिजे, तेव्हा आम्हाला न्याय मिळेल. अशी भावना शेख इब्राहीम यांनी डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या स्थितीत भावविवश होत व्यक्त केली. तर वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्यांवर कडक कारवाई व्हावी, अशी अपेक्षा मयत रफिक शेख यांच्या मुलाने देखील व्यक्त केली.

'इन्साफ होना चाहिए' ही आमची भावना- मौलाना अब्दुल कय्युम कासमी

तत्कालीन जमीयत उलेमा संघटनेचे मौलाना अब्दुल कय्युम कासमी यांनी या बॉम्बस्फोटानंतर मृत झालेल्या व गंभीर जखमी झालेल्या नागरिकांना न्याय मिळावा यासाठी न्यायालयीन लढाईला मदत केली. शहरातील शांतता बाधित होणार नाही यासाठी विशेष प्रयत्न केले. सुपारी फुटली तरी दंगे फसाद होईल, अशी परिस्थिती मालेगावात असतांना पोलीस प्रशासन व सरकारच्या आदेशाचे पालन करत आम्ही शांतता राखण्यासाठी प्रयत्न केले..'इन्साफ होना चाहिए ' ही आमची भावना आहे..पुन्हा त्यांनी अशी कृत्ये करू नये म्हणून त्यांना सजा मिळणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया मौलाना अब्दुल कय्युम कासमी यांनी व्यक्त केली.

ज्यांची स्कूटर वापरली गेली त्या प्रग्यासिंह ठाकूर यांचेसह कट रचणारे कर्नल पुरोहित, असिमानंद आदींसह त्यांचे सहकारी हे या बॉम्बस्फोटातील आरोपी असल्याचे वेगवेगळे पुरावे न्यायालयाकडे दिले आहे. हा कट कुठे रचला गेला, कोणी रेकी केला, आरोपींच्या लॅपटॉपमध्ये काय मिळाले, दूरध्वनी संवादात काय चर्चा झाली, याचे सगळे पुरावे एनआयएच्या विशेष न्यायालयाकडे सादर केलेले आहेत. त्यामुळे आरोपींना नक्की सजा मिळेल. न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास असल्याचे बॉम्बस्फोटानंतर सुरवातीच्या काळात वकील म्हणून ज्यांनी काम पाहिले त्या हमदानी इरफाना यांनी सांगितले. तर संविधान आणि न्यायालय यावर आमचा विश्वास आहे, नक्कीच आम्हाला न्याय मिळेल अशी प्रतिक्रिया मालेगाव मध्यचे आजी- माजी आमदार यांनी दिली.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chaitra Amavasya 2026: यंदाची चैत्र अमावस्या 5 राशींचं भाग्य घेऊन येतेय! सर्वार्थ सिद्धी शुभ योग जुळतोय, नकारात्मक ऊर्जा राहील दूर, संपत्तीचा मार्ग मोकळा...
यंदाची चैत्र अमावस्या 5 राशींचं भाग्य घेऊन येतेय! सर्वार्थ सिद्धी शुभ योग जुळतोय, नकारात्मक ऊर्जा राहील दूर, संपत्तीचा मार्ग मोकळा...
Chhatrapati Sambhajinagar Crime News : पहिल्या नवऱ्याने जीवन संपवलं; पदरात दोन मुलं, दुसरं लग्न केलं पण भयंकर शेवट झाला, छ. संभाजीनगरमधील हादवणारी घटना
पहिल्या नवऱ्याने जीवन संपवलं; पदरात दोन मुलं, दुसरं लग्न केलं पण भयंकर शेवट झाला, छ. संभाजीनगरमधील हादवणारी घटना
Prakash Abitkar on Eknath Shinde: मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी नायक पिक्चरच्या अनिल कपूरसारखं काम केलं; प्रकाश आबिटकरांकडून उपमुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक
मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी नायक पिक्चरच्या अनिल कपूरसारखं काम केलं; प्रकाश आबिटकरांकडून उपमुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक
Maharashtra Live blog updates: उन्हाळी सुट्टीत सर्वसामान्यांचा बस प्रवास महागला, 15 एप्रिल ते 15 जून दरम्यान 10% भाडेवाडीचा निर्णय
Maharashtra Live blog updates: उन्हाळी सुट्टीत सर्वसामान्यांचा बस प्रवास महागला, 15 एप्रिल ते 15 जून दरम्यान 10% भाडेवाडीचा निर्णय

व्हिडीओ

Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण
Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत
Rohit Pawar : पार्थ पवारांच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त केली, काँग्रेस सकारात्मक निर्णय घेतील - पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhurandhar 2 on OTT: बॉक्स ऑफिसवर वादळी ठरला, आता धुरंधर 2 OTTवर येणार, Netflix नाही इथे होणार रिलीज? कधी येतोय?
बॉक्स ऑफिसवर वादळी ठरला, आता धुरंधर 2 OTTवर येणार, Netflix नाही इथे होणार रिलीज? कधी येतोय?
Sangli Crime: अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा पत्नीनंच काटा काढला, प्रियकराच्या मदतीने संपवलं, मात्र सत्य समोर आलंच, घटनेनं कवठेमहांकाळ हादरलं!
अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा पत्नीनंच काटा काढला, प्रियकराच्या मदतीने संपवलं, मात्र सत्य समोर आलंच, घटनेनं कवठेमहांकाळ हादरलं!
Uttar Pradesh Accident: गाजीपुरमध्ये यात्रेकरूंनी भरलेली बस डिव्हायडरला धडकून उलटली, महाराष्ट्रातील दोन महिलांचा जागीच अंत, 35 यात्रेकरू जखमी
देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, गाजीपुरमध्ये यात्रेकरूंनी भरलेली बस डिव्हायडरला धडकून उलटली, दोन महिलांचा जागीच अंत, 35 यात्रेकरू जखमी
Maharashtra Live blog updates: उन्हाळी सुट्टीत सर्वसामान्यांचा बस प्रवास महागला, 15 एप्रिल ते 15 जून दरम्यान 10% भाडेवाडीचा निर्णय
Maharashtra Live blog updates: उन्हाळी सुट्टीत सर्वसामान्यांचा बस प्रवास महागला, 15 एप्रिल ते 15 जून दरम्यान 10% भाडेवाडीचा निर्णय
Mumbai Metro 3 : मेट्रो-3 ‘ॲक्वा लाईन’चा मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार
मेट्रो-3 ‘ॲक्वा लाईन’चा मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार
KKR vs LSG : मुकूल चौधरीच्या वादळात केकेआरचा बालेकिल्ला ढासळला, लखनौच्या हातातून गेलेली मॅच जिंकवली, केकेआरचा तिसरा पराभव
मुकूल चौधरीच्या वादळात केकेआरचा बालेकिल्ला ढासळला, लखनौच्या हातातून गेलेली मॅच जिंकवली
BMC Budget 2026 : मुंबई महापालिकेचा कॅन्सर रुग्णालयासह पर्यावरणावर फोकस; महापालिकेचा 80952 कोटींचा अर्थसंकल्प सभागृहात सादर
मुंबई महापालिकेचा कॅन्सर रुग्णालयासह पर्यावरणावर फोकस; महापालिकेचा 80952 कोटींचा अर्थसंकल्प सभागृहात सादर
Baramati byelection 2026: बारामतीत काँग्रेसची माघार, पण 'हे' 22 जण मागे हटलेच नाहीत, सुनेत्रा पवारांविरोधात शड्डू ठोकणारे कोण?
बारामतीत काँग्रेसची माघार, पण 'हे' 22 जण मागे हटलेच नाहीत, सुनेत्रा पवारांविरोधात शड्डू ठोकणारे कोण?
Embed widget