युगेंद्र पवारांनी रणशिंग फुंकलं, संपर्क कार्यालयात ठोकला तळ, राजकीय आखाड्यात उतरणार का?
युगेंद्र पवार हे राजकारणात सक्रीय होण्याची शक्यता वर्तवली जातेय. कारण, युगेंद्र पवार हे बारामतीमधील पक्ष कार्यालयात आलेत. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कार्यालयात आलो असल्याचं त्यांनी सांगितलं.
![युगेंद्र पवारांनी रणशिंग फुंकलं, संपर्क कार्यालयात ठोकला तळ, राजकीय आखाड्यात उतरणार का? Yugendra Pawar has entered the central office of Baramati to solve the problems of the people युगेंद्र पवारांनी रणशिंग फुंकलं, संपर्क कार्यालयात ठोकला तळ, राजकीय आखाड्यात उतरणार का?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/14/9d25e944a4c7fdf24d01e321d7a525ed1715668302418339_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Yugendra Pawar : युगेंद्र पवार हे राजकारणात सक्रीय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण, युगेंद्र पवार हे बारामतीमधील पक्ष कार्यालयात आले आहेत. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कार्यालयात आलो असल्याचं युगेंद्र पवार यांनी सांगितलं. युगेंद्र पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच सख्खे पुतण आहेत. मात्र, सध्या ते शरद पवार यांच्याबरोबर आहेत.
लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यालयात आलो
लोकसभा निवडणूक झाल्यानंतर जे आता प्रचारासाठी फिरतायेत ते तुम्हाला सात तारखेनानंतर कुठेही दिसणार नाहीत असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं. त्यानंतर अजित पवारांचे सख्खे पुतणे योगेंद्र पवार हे बारामतीतल्या पक्ष कार्यालयात आले आहेत. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यालयात आलो असल्याचं युगेंद्र पवार यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.
मध्यवर्ती कार्यालयात लोकांना भेटायला सोपं पडतं
निवडणूक काळात मी फिरत होतो. यावेळी लोक प्रश्न सांगत होते. मी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे युगेंद्र पवार यांनी सांगितलं. लोकांचा संपर्क वाढला आहे. त्यामुळं मध्यवर्ती कार्यालयात मी लोकांना भेटत असल्याचे ते म्हणाले. मी गेली तीन ते चार वर्षे झालं कण्हेरीच्या घरी भेटायचो पण आता इथे भेटत असल्याचे युगेंद्र पवार म्हणाले. आता मध्यवर्ती कार्यालयात लोकांना भेटायला सोपं पडतं असे युगेंद्र पवार म्हणाले.
युगेंद्र पवार राजकारणात येणार का?
राजकारणात यायचा विचार केला नाही, परंतू, जर राजकारणात पुढे यायचं असेल लोकांची काम करावी लागतात. त्यांचे प्रश्न समजावून घ्यावे लागतात. मी अजून एवढा पुढचा विचार केला नाही, पुढचं पुढे बघू अशी प्रतिक्रिया युगेंद्र पवार यांनी दिली.
जितदादांवर बोलण्याइतपत मी मोठा नाही
माझे इथे छोटे मोठे व्यवसाय आहेत. राजू दादा देखील इथेच शेती क्षेत्रात काम करतात. रणजीत अण्णा देखील इथेच काम करत असल्याचे युगेंद्र पवार म्हणाले. आमची शेती इथेच असल्याचे ते म्हणाले. दादांनी मिशी संदर्भात जे वक्तव्य केले आहे त्यावर मी कसे बोलणार? अजितदादांवर बोलण्याइतपत मी मोठा नसल्याचे युगेंद्र पवार म्हणाले. याआधी आम्ही सगळे इथेच असतो कामानिमित्त बाहेर असतो असे ते म्हणाले. सोमवार ते गुरुवार मी इथेच असतो. आता लोकांना जास्त माहिती झालं आहे असे युगेंद्र पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
Yugendra Pawar Vs Ajit Pawar :विधानसभेलादेखील पवार विरुद्ध पवार लढत; अजित पवार आणि युगेंद्र पवार एकमेकांविरोधात उभे ठाकणार?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)