एक्स्प्लोर

Yugendra Pawar Vs Ajit Pawar :विधानसभेलादेखील पवार विरुद्ध पवार लढत; अजित पवार आणि युगेंद्र पवार एकमेकांविरोधात उभे ठाकणार?

सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीचे आमदार आहे. त्यांच्याविरोधात विधानसभेत कोण उभं ठाकणार, असं विचारल्यास बारामतीकर युगेंद्र पवार असण्याची शक्यता असल्याचं म्हणताना दिसत आहे. 

बारामती, पुणे : लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक (Baramati Loksabha election) चर्चा बारामती लोकसभा मतदारसंघाची सुरु आहे. पवार विरुद्ध पवार अशी लढत होत आहे. लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरु असतानाच बारामतीत विधानसभेच्या निवडणुकीची चर्चा रंगू लागली आहे. सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) बारामतीचे आमदार आहे. त्यांच्याविरोधात विधानसभेत कोण उभं ठाकणार, असं विचारल्यास बारामतीकरांनी थेट युगेंद्र पवारांचं (Yugendra Pawar)  नाव घेतलं आहे. 

बारामतीकर म्हणाले, बारामतीला विधानसभेत नव्या चेहऱ्याची गरज आहे. त्यात युगेंद्र पवार हा तरुण आणि चांगला चेहरा आहे. आम्हाला बारामतीत नवीन आमदार हवा आहे. आतापर्यंत बारामतील अजित पवारांना निवडून आणलं त्यांना मंत्री केलं, उपमुख्यमंत्री केलं. आता मात्र बारामतीचा भावी आमदार कोण विचारल्यास थेट युगेंद्र पवारांचं नाव घेतलं आहे. भावी आमदार म्हणून युगेंद्र पवारांच्या नावाला पसंती दिली आहे. 

बारामतील शरद पवारांनंतर सुसंस्कृत चेहरा आणि संयमी नेतृत्व असलेला चेहरा हा युगेंंद्र पवारांना आता बारामतीकरांना सापडला आहे. त्यात युगेंद्र पवारांना बघितलं की शरद पवारांची प्रतिकृती दिसते. त्यामुळे आता युगेंद्र पवारांच्या पाठीशी आम्ही ताकदीने उभे राहणार आहोत, असं बारामतीकर म्हणाले. 

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बारामतीत सध्या नणंद विरुद्ध भावजय अशी लढत होत आहे. त्याची चर्चा सर्वत्र होत आहे. त्यानंतर अशीच तगडी लढत विधानसभेत होण्याची शक्यता दिसते आहे. मधल्या काळात अनेक गणितं बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र असं झाल्यास पुन्हा पवार विरुद्ध पवार लढत पाहायला मिळू शकते.

कोण आहेत युगेंद्र पवार?

युगेंद्र पवार हे अजित पवारांचे पुतणे आणि शरद पवार यांचे नातू आहेत. शरद पवारांना फॉलो करणारे युगेंद्र पवार हे बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत. बारामतीतील शरयू अॅग्रोचे ते अध्यक्ष आहेत तसेच विद्या प्रतिष्ठानमध्येही विश्वस्त आहेत. फलटण तालुक्यातील शरयू शुगर कारखाना हा युगेंद्र पवार पाहतात. मात्र यंदा पहिल्यांदात ते राजकारणात सक्रिय दिसत आहे. सुप्रिया सुळेंचा प्रचार करताना सभा घेताना दिसत आहेत. 

इतर महत्वाची बातमी-

lok sabha election Votting : वासुदेव आला रे, वासुदेव आला...; पिंपरी चिंचवडमध्ये वासुदेव करतायत मतदानासाठी जनजागृती

Rahul Gandhi : राहुल गांधींच्या अमेठी लढतीवर जवळपास शिक्कामोर्तब; हायहोल्टेज लढत पुन्हा रंगणार

 

महत्त्वाच्या बातम्या

Pune DJ Ban Controversy : बापाने मांडीवर प्राण सोडले, लेकाला फिट, DJ मुळे दुसऱ्यांच्या घरी झोपायला जातात, कधी 'रिफ्युजी एरिया'मध्ये काढतात रात्री, भयभीत कदम कुटुंबाची भीषण आपबिती
बापाने मांडीवर प्राण सोडले, लेकाला फिट, DJ मुळे दुसऱ्यांच्या घरी झोपायला जातात, कधी 'रिफ्युजी एरिया'मध्ये काढतात रात्री, भयभीत कदम कुटुंबाची भीषण आपबिती
Pune Crime News : जर्मनीत नोकरी, आठ दिवसांपूर्वी घरी परतला अन्.... पुण्यातील तरुण IT इंजिनिअरने उचललं टोकाचं पाऊल
जर्मनीत नोकरी, आठ दिवसांपूर्वी घरी परतला अन्.... पुण्यातील तरुण IT इंजिनिअरने उचललं टोकाचं पाऊल
माझ्या सख्ख्या चुलत भावाचा गतवर्षी डीजेमुळे मृत्यू झाला; मंत्री मेघना बोर्डीकरांनी गणेशोत्सवाबाबत मांडली परखड भूमिका
माझ्या सख्ख्या चुलत भावाचा गतवर्षी डीजेमुळे मृत्यू झाला; मंत्री मेघना बोर्डीकरांनी गणेशोत्सवाबाबत मांडली परखड भूमिका
Pune Crime News: मध्यरात्री लॉक तोडून आत शिरले; मुख्य गेटचा कोयंडा तोडला, सेफ्टी दरवाजा तोडून आत गेले अन्...; 'चड्डी-बनियान गँग'ची शाळेत चोरी, 12 लाखांचा ऐवज लंपास
मध्यरात्री लॉक तोडून आत शिरले; मुख्य गेटचा कोयंडा तोडला, सेफ्टी दरवाजा तोडून आत गेले अन्...; 'चड्डी-बनियान गँग'ची शाळेत चोरी, 12 लाखांचा ऐवज लंपास

व्हिडीओ

Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले
Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मध्य प्रदेशात विषारी दारुचे तब्बल 11 बळी, रुग्णांचे मृतदेह निळे पडले, दोन गावांवर शोककळा
मध्य प्रदेशात विषारी दारुचे तब्बल 11 बळी, रुग्णांचे मृतदेह निळे पडले, दोन गावांवर शोककळा
Solapur : सोलापूर-मुंबई विमानसेवा पुन्हा बंद, स्टार एअरचा मोठा निर्णय, कंपनीनं कारण काय सांगितलं?
सोलापूर-मुंबई विमानसेवा पुन्हा बंद, स्टार एअरचा मोठा निर्णय, कंपनीनं कारण काय सांगितलं?
Pimpri Chinchwad Mahavitaran blast: पिंपरी-चिंचवडच्या महावितरणच्या सबस्टेशनमध्ये मोठा स्फोट, वीजपुरवठा खंडित
पिंपरी-चिंचवडच्या महावितरणच्या सबस्टेशनमध्ये मोठा स्फोट, वीजपुरवठा खंडित
दिल्लीत एकाचवेळी दोन इमारती कोसळल्या, त्यापैकी एक सहा मजली पीजी, बहुतेक दिल्ली विद्यापीठाचे विद्यार्थी; तळमजल्यावर दुकाने
दिल्लीत एकाचवेळी दोन इमारती कोसळल्या, त्यापैकी एक सहा मजली पीजी, बहुतेक दिल्ली विद्यापीठाचे विद्यार्थी; तळमजल्यावर दुकाने
Gold and Silver Purity Test : सोने-चांदीची खरेदी करण्यापूर्वी डाऊनलोड करा 'हे' ॲप; काही मिनिटांतच तपासा शुद्धता, जाणून घ्या सोपी पध्दत
सोने-चांदीची खरेदी करण्यापूर्वी डाऊनलोड करा 'हे' ॲप; काही मिनिटांतच तपासा शुद्धता, जाणून घ्या सोपी पध्दत
'आता आम्ही राॅकेट बनवणार की नाही?' इस्रोच्या नऊ कर्मचारी संघटनांसह हजारो कर्मचाऱ्यांनी अध्यक्षांना लिहिलं पत्र, खासगीकरणावर स्पष्टता देण्याची मागणी
'आता आम्ही राॅकेट बनवणार की नाही?' इस्रोच्या नऊ कर्मचारी संघटनांसह हजारो कर्मचाऱ्यांनी अध्यक्षांना लिहिलं पत्र, खासगीकरणावर स्पष्टता देण्याची मागणी
Raj Thackeray: कसले डाॅल्बी लावताय, यात कसला आनंद आलाय? गणपती जाताना घरं मोकळं मोकळं वाटतं, वाईट वाटतं, त्यात डाॅल्बीचा कसला आनंद आणताय?? राज ठाकरेंनी डीजे समर्थकांना थेट फटकारलं
कसले डाॅल्बी लावताय, यात कसला आनंद आलाय? गणपती जाताना घरं मोकळं मोकळं वाटतं, वाईट वाटतं, त्यात डाॅल्बीचा कसला आनंद आणताय?? राज ठाकरेंनी डीजे समर्थकांना थेट फटकारलं
माझ्या सख्ख्या चुलत भावाचा गतवर्षी डीजेमुळे मृत्यू झाला; मंत्री मेघना बोर्डीकरांनी गणेशोत्सवाबाबत मांडली परखड भूमिका
माझ्या सख्ख्या चुलत भावाचा गतवर्षी डीजेमुळे मृत्यू झाला; मंत्री मेघना बोर्डीकरांनी गणेशोत्सवाबाबत मांडली परखड भूमिका
Embed widget