एक्स्प्लोर
जालन्यात बिबट्याच्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू
परिसरात गेल्या अनेक दिवसापासून बिबट्या दिसत असल्याची तक्रार गावरकऱ्यांकडून होत होती. मात्र बिबट्याला शोधण्यास वनविभागाला अपयश आलं.

जालना : जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील राजेगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू झाला आहे. अरुण अहिरे असं या युवकाचं नाव आहे. राजेगाव शिवारात सकाळी शेतात मजुरीसाठी जाणाऱ्या अरुणवर बिबट्याने प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात अरुणचा जागीच मृत्यू झाला.
घनसागंवीतील काही गावांत गेल्या अनेक दिवसापासून बिबट्या दिसत असल्याची तक्रार गावरकऱ्यांकडून होत होती. मात्र बिबट्याला शोधण्यास वनविभागाला अपयश आलं. गावाजवळच असलेल्या शिवारात बिबट्याने केलेल्या या हल्ल्याने गावकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.
दरम्यान, बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
नागपूर
व्यापार-उद्योग























