Coronavirus | राज्यात आज 170 नवे कोरोना बाधित; रुग्णांची संख्या वाढून 2801 वर
राज्यात आज दुपारपर्यंत 170 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. परिणामी राज्यातील रुग्णांचा आकडा वाढून 2801 वर पोहचला आहे.
मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या 170 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 2801 वर पोहोचली आहे. यात सर्वाधिक मुंबईत 66 जणांची नोंद झाली. तर, त्याखालोखाल 44 रुग्ण पुणे महापालिका हद्दीत सापडले आहेत. (ही आकडेवारी दुपारी पावणेतीन पर्यंतची आहे) मुंबईतील कोरोना हॉटस्पॉटची संख्या सातवर गेली आहे. एकूण रूग्णांपैकी सात वॉर्डमध्येच 50 टक्क्यांहून अधिक रूग्णांची नोंद करण्यात आलीय. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्व संवेदनशील भाग सील करण्यात आले आहेत. राज्यातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहे.
सध्या राज्यात 67 हजार 701 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 5647 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत अडीचशेहून अधिक कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन मे पर्यंत लॉकडाऊन वाढवले आहे. मात्र, आता कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येनुसार राज्यातील जिल्ह्यात झोन करण्यात येणार आहे.
Coronavirus | जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या 20 लाख पार; फक्त न्यूयॉर्कमध्ये 10 हजार लोकांचा मृत्यू
महाराष्ट्र एकूण रूग्ण – 2801
मुंबई महानगरपालिका- 1822 (मृत्यू 112)
ठाणे - 12
ठाणे महानगरपालिका- 97 (मृत्यू 3)
नवी मुंबई मनपा - 63 (मृत्यू 3)
कल्याण डोंबिवली- 50 (मृत्यू 2)
उल्हासनगर- 1
भिवंडी, निजामपूर - 1
मिरा-भाईंदर- 51 (मृत्यू 2)
पालघर- 5 (मृत्यू 1 )
वसई- विरार- 30 (मृत्यू 3)
रायगड- 5
पनवेल- 10 (मृत्यू 1)
नाशिक - 2
नाशिक मनपा- 2
मालेगाव मनपा - 42 (मृत्यू 2)
अहमदनगर- 10 (मृत्यू 1)
अहमदनगर मनपा - 17
धुळे -2 (मृत्यू 1)
जळगाव- 1
जळगाव मनपा- 1 (मृत्यू 1)
पुणे - 10
पुणे मनपा- 354 (मृत्यू 34)
पिंपरी-चिंचवड मनपा- 32 (मृत्यू 1)
सातारा- 6 (मृत्यू 2)
सोलापूर मनपा- 1 (मृत्यू 1)
कोल्हापूर- 1
कोल्हापूर मनपा- 5
सांगली- 26
सिंधुदुर्ग- 1
रत्नागिरी- 6 (मृत्यू 1)
औरंगाबाद मनपा- 23 (मृत्यू 2)
जालना- 1
हिंगोली- 1
लातूर मनपा-8
उस्मानाबाद-4
बीड - 1
अकोला मनपा - 12
अमरावती मनपा- 6 (मृत्यू 1)
यवतमाळ- 5
बुलढाणा - 17 (मृत्यू 1)
वाशिम - 1
नागपूर- 5
नागपूर मनपा - 39 (मृत्यू 1)
गोंदिया - 1
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात एकूण 5059 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 18.37 लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.