Palghar: आर्थिक चणचणीला कंटाळून युवक-युवतीची आत्महत्या, पालघर जिह्यातील घटनेनं खळबळ
पालघरमधील वरखंडा या गावच्या युवक आणि युवतीचे एकमेकांवर प्रेम होतं. पण आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे.
पालघर: एका धक्कादायक घटनेने पालघर जिल्हा हादरला आहे. डहाणू तालुक्यातील वरखंडा गावच्या हद्दीतील कुर्झे धरणालगत एका झाडाला गळफास घेऊन युवक-युवतीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सुष्मिता प्रकाश भीमरा (वय 21) आणि सुदीप धाकू उंबरसाडा (वय 23, दोघेही रा. वरवडा डोंगरीपाडा) अशी आत्महत्या करणाऱ्या दोघांची नावे आहेत. या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं, पण गेल्या काही दिवसांपासून या दोघांनाही आर्थिक चणचणीला सामोरं जावं लागत होतं. याच आर्थिक परिस्थितीला कंटाळून दोघांनीही आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याची प्रथमदर्शनी माहिती आहे.
या घटनेची माहिती मिळताच तलासरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला आणि नंतर ते मृतदेह शवविच्छेदनाकरिता तलासरी ग्रामीण रुग्णालयात रवाना केले.
सुष्मिता भीमरा व सुदीप उंबरसाडा यांचे एकमेकांवर प्रेम होते. काही महिन्यांपूर्वी त्यांचा साखरपुडा देखील झाल्याचे सांगण्यात येत आहे. सुदीप याचा सलून व्यवसाय होता. परंतु सलून चालत नसल्याने तो एका खाजगी कंपनीमध्ये कामगार म्हणून तो कामाला जात होता. मात्र, मागील दोन आठवड्यापासून सुदीपने कंपनीत जाणे अचानक बंद केले होते.
प्रथमदर्शनी मिळालेल्या माहितीवरून, काही दिवसापासून आर्थिक चणचणीमुळे या दोघांचीही मानसिक अवस्था बिघडली होती. त्यांचं मानसिक खच्चीकरण झालं होतं. यामुळं आर्थिक चणचणीला कंटाळूनच या दोघांनीही जीवन संपवल्याचं सांगण्यात येत आहे. तलासरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
- कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची नात सौंदर्याची आत्महत्या; घटनेनं खळबळ
- भैय्यू महाराज आत्महत्या प्रकरण : आरोपींना 6 वर्षाची शिक्षा, मुख्य सेवक विनायक, ड्रायव्हर शरद आणि केअरटेकर पलक दोषी
- धक्कादायक ! साताऱ्यात एकाच दिवशी सहा जणांची आत्महत्या, गळफास घेऊन संपवले जीवन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह -