कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची नात सौंदर्याची आत्महत्या; घटनेनं खळबळ
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा (BS Yediyurappa) यांची नात सौंदर्या हिनं आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. 30 वर्षीय सौंदर्या या बंगळुरुच्या एमएस रमैया हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होत्या.
बंगळुरु : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा (BS Yediyurappa) यांची नात सौंदर्या हिनं आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. 30 वर्षीय सौंदर्या या बंगळुरुच्या एमएस रमैया हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होत्या. त्यांचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्यांना एक सहा महिन्यांचं बाळ देखील आहे. माउंट कार्मेल कॉलेजजवळील एका उच्चभ्रू अपार्टमेंटमध्ये त्यांनी आत्महत्या केली आहे. येडियुरप्पा यांच्या मोठ्या कन्या पद्मा यांची सौंदर्या ही थोरली मुलगी. सौंदर्या यांच्या आत्महत्येनं राज्यभरात एकच खळबळ उडाली असून त्यांनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
Former Karnataka CM BS Yediyurappa's granddaughter Soundarya found hanging at a private apartment in Bengaluru. Postmortem is going on at Bowring and Lady Curzon Hospital: Office of BS Yediyurappa
— ANI (@ANI) January 28, 2022
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सौंदर्याने शुक्रवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. Bowring hospital मध्ये सौंदर्या यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. त्यानंतरच मृत्यूचे कारण समोर येईल असे पोलिसांनी म्हटले आहे.
Bengaluru's High Grounds Police Station begins investigation into the death of former Karnataka CM BS Yediyurappa's granddaughter Soundarya who was found hanging at a private apartment today.
— ANI (@ANI) January 28, 2022
सौंदर्या बंगळूरमधील एका खासगी रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या. त्या आपल्या पतीसह राहत होती. सौंदर्याचे पती सुद्धा डॉक्टर आहेत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
इतर महत्वाच्या बातम्या