तुम्ही हिंदुत्वासाठी इथं आला, मग डुप्लिकेट हिंदुत्व दाखवणाऱ्या विरोधात बोलल्यावर तुम्हाला राग का येतो? राणेंचा केसरकरांना सवाल
Nilesh Rane On Deepak Kesarkar: जे डुप्लिकेट हिदुत्व दाखवत होते. त्यांच्याबद्दल आम्ही काही बोललो तर तुम्हाला राग येण्याचं कारण काय?'', असा निलेश राणे यांनी दीपक केसरकर यांना विचारला आहे.
Nilesh Rane On Deepak Kesarkar: ''उद्धव ठाकरे डुप्लिकेट हिंदुत्व दाखवत होते, म्हणून तुम्ही इथे आलात. जे डुप्लिकेट हिदुत्व दाखवत होते. त्यांच्याबद्दल आम्ही काही बोललो तर तुम्हाला राग येण्याचं कारण काय?'', असा प्रश्न माजी खासदार निलेश राणे यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांना विचारला आहे. एबीपी माझाशी बोलताना ते म्हणाले आहेत की, ''उद्धव ठाकरे डुप्लिकेट हिंदुत्व दाखवत होते, म्हणून तुम्ही इथे आलात. मग उद्धव ठाकरे यांचा इतका पुळका कशाला?''
दीपक केसरकर यांना लक्ष्य करत निलेश राणे म्हणाले आहेत की, ''दीपक केसरकर हे शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत, असे ते बोलतात. मात्र ते वागतात असे की, ते विश्व प्रवक्ते आहेत. त्यांना सर्व कळतं. ते असे वागत आहेत की, त्यांना बोरिस जॉन्सन यांच्याबद्दल विचारलं तर ते त्यावरही बोलतील. एकनाथ शिंदे यांनी केसरकर यांना पुन्हा एकदा राजकीय जीवनदान दिलं आहे. राजकीय कुबड्या दिल्या. मी माझ्या ट्वीटमध्ये म्हटल्याप्रमाणे जितकी युती टिकवण्याची जबाबदारी आमची आहे, तितकी त्यांचीही आहे.'' ते म्हणाले की, केसरकरांनी नको त्या गोष्टीत पडू नये. राणेंच्या दोन मुलांनी मतदारसंघात केसरकर यांना झिरो केलं, असं ते म्हणाले आहेत.
केसरकर यांना आम्हाला कमी लेखायचं होतं: निलेश राणे
निलेश राणे म्हणाले की, ''शरद पवार वयाच्या 38 व्या वयात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मी 41, 42 वर्षांचा आहे. केसरकर यांना वयाबद्दल बोलायचं नव्हतं, त्यांना आम्हाला कमी लेखायचं होतं.'' राणे म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आम्ही आजच असे बोलत आहोत, असे नाही. मागच्या अडीच वर्षांपासून आम्ही असेच बोलत होतो. मात्र तेव्हा केसरकर काही बोलले नाही. कारण त्यांना उद्धव ठाकरेंनी मंत्री केलं नाही. उद्धव ठाकरे आणि कुटुंबावर आम्ही जहरी टीका केली, जेव्हा ते सत्तेत होते. तेव्हा का केसरकर बोलले नाही.'' राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे डुप्लिकेट हिंदुत्व दाखवत होते, ''म्हणून तुम्ही इथे आलात. मग उद्धव ठाकरे यांचा इतका पुळका कशाला? हिंदुत्वासाठी तुम्ही इथं आला. जर हिंदुत्वासाठी ही युती झाली असेल आणि जे डुप्लिकेट हिदुत्व दाखवत होते. त्यांच्याबद्दल आम्ही काही बोललो तर तुम्हाला राग येण्याचं कारण काय?, असं ते म्हणाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
Video: 'दीपक केसरकर लिमिटमध्ये राहा, तुम्ही शिंदे गटाचे प्रवक्ते आहात, आमचे नाही': निलेश राणे