Video: 'दीपक केसरकर लिमिटमध्ये राहा, तुम्ही शिंदे गटाचे प्रवक्ते आहात, आमचे नाही': निलेश राणे
Nilesh Rane On Deepak Kesarkar: शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांना भाजप नेते निलेश राणे यांनी लिमिटमध्ये राहण्याचा इशारा दिला आहे.
Nilesh Rane On Deepak Kesarkar: शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांना भाजप नेते निलेश राणे यांनी लिमिटमध्ये राहण्याचा इशारा दिला आहे. निलेश राणे म्हणाले आहेत की, ''युती टिकवण्याची जितकी जबाबदारी आमची आहे, तितकीच तुमचीही आहे. तुम्ही शिंदे गटाचे प्रवक्ते आहात. आमचे नाही.'' ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत ते असे म्हणाले आहेत. या व्हिडीओला त्यांनी 'दीपक केसरकर लिमिटमध्ये राहा', असं कॅप्शन देऊन शेअर केलं आहे.
निलेश राणे म्हणाले आहेत की, ''दीपक केसरकर कुठे तरी बोलले, राणेंची दोन्ही मुले लहान आहेत. त्यांना समज देण्याची गरज आहे. दीपक केसरकर आपण युतीत आहोत. विसरू नका. युती टिकवण्याची जितकी जबाबदारी आमची आहे, तितकीच तुमचीही आहे. तुम्ही शिंदे गटाचे प्रवक्ते आहात. आमचे नाही. तुमची अवस्था आम्ही मतदारसंघात काय केली आहे, हे आम्हाला माहित आहे. राणेंच्या याच दोन मुलांनी तुमची नगरपालिका तुमच्याकडून घेतली. आज भारतीय जनता पक्ष आहे तिकडे. जिल्हा परिषद देखील आमच्याकडे. पंचात समिती सदस्य तुमच्या मतदारसंघातील आमच्याकडे आहे.''
दीपक केसरकर लिमिटमध्ये राहा. pic.twitter.com/LARj8cVLoO
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 13, 2022
राणे पुढे म्हणाले की, ''केसरकर तुमची मतदारसंघात काय अवस्था आहे, हे आम्हाला माहित आहे. तुम्हाला दुसरं राजकीय जीवनदान मिळालं आहे. हे विसरू नका.'' ते म्हणाले, तुम्ही आम्हाला ज्या भाषेत सांगाल, त्या भाषेत उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत. पण वातावरण खराब करू नका. जबाबदारी आपल्या दोघांवर आहे, विसरू नका, असंही ते म्हणाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
Nitin Gadkari : आता सुसाट प्रवास! स्पीड गनची भीती नाही, हाय-वेवरील वेगमर्यादा वाढणार
Pune Rain : पुणेकरांनो गरज नसेल तर घराबाहेर पडू नका! शाळा तीन दिवस बंद, पर्यटन स्थळांवरही जमावबंदी