एक्स्प्लोर

Yavatmal Washim Lok Sabha: यवतमाळ वाशिम लोकसभा मदारसंघासात आज मविआचे दिग्गज नेते मैदानात; महायुतीचा उमेदवार मात्र ठरता ठरेना

Yavatmal Washim Lok Sabha: मविआचे ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी आदित्य ठाकरे, रोहित पवार आदींसह मविआचे अनेक दिग्गज नेते यावेळी उपस्थित राहणार आहे.

Yavatmal Washim Lok Sabha:  लोकसभा निवडणुकांचं (Lok Sabha Election 2024) बिगुल केव्हाच वाजलं असून लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील (Lok Sabha Election Second Phase) निवडणुकांसाठी आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक राहिले आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीत (Mahayuti) उमेदवाराच्या चर्चेचे गुऱ्हाळ आणि खलबते सुरू असून अद्याप उमेदवारीचा तिढा कायम आहे. तर दुसरीकडे या मतदारसंघात  महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) वतीने जोरदार प्रचाराचा धूरळा सुरू करण्यात आला आहे.

आशातच मविआकडून (Maha Vikas Aghadi) आज संजय देशमुख  (Sanjau Deshmukh) हे जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे. हा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ठाकरे गटाच्या युवा सेनेचे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)आणि शरद पवार गटाचे रोहित पवार(Rohit Pawar) यांच्यासह काँग्रेसचे इतर ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहे. यवतमाळच्या पोस्टल ग्राउंडवर आज मविआची जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून यात ठाकरे आणि पवार गटाच्या युवा नेत्यांकडून शिंदे गटावर काय तोफ डागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मविआचे दिग्गज नेते मैदानात

महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार, अनिल देशमुख आदींसह मविआचे ज्येष्ठ नेतेही यावेळी उपस्थित राहणार आहे. सध्याघडीला महाराष्ट्रात असे चित्र निर्माण झाले आहे की, उद्धव ठाकरे यांना शेतकरी, तरुण आणि बेरोजगारांची प्रचंड सहानुभूती आहे. उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षात जे काम केले त्याचा फायदा आता होताना दिसत आहे.

खासदार भावना गवळी, पालकमंत्री संजय राठोड यांनी जी गद्दारी केल्याने मतदारातसंघात प्रचंड नाराजी असून त्यांना विरोध होतो आहे. आजपर्यंत शिवसेनेने या दोघांना सर्वकाही दिले. मात्र असे असताना पण त्यांनी गद्दारी केल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. त्यामुळे आता उमेदवार कोणीही असोत, उद्धव ठाकरे यांना संपूर्ण महाराष्ट्रात सहानुभूती आहे. परिणामी आमचाच महाराष्ट्रात मोठ्या मताधिक्याने विजय होईल असा विश्वास ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार संजय देशमुख यांनी बोलताना व्यक्त केलाय.  

महायुतीचा उमेदवार मात्र ठरता ठरेना!

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. 1999 ते 2009 वाशिम तर पुनर्रचनेनंतर 2009 पासून 2024 पर्यंत या ठिकाणी खासदार भावना गवळी या पाच टर्म प्रतिनिधित्व करीत आहे. मात्र शिवसेनेत उभी फूट पडल्या नंतर खासदार भावना गवळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्या आणि हा मतदारसंघात आता त्यांच्या वाटेला आला आहे. मात्र आता याठिकाणी पाच टर्म खासदार राहिलेल्या भावना गवळी यांना अद्यापही उमेदवारी घोषित न झाल्याने उमेदवारीचा तिढा अद्याप कायम आहे.

असे असताना भावना गवळी यांच्या नावावर भाजप (BJP) अनुकूल नसल्याने नवीन उमेदवार शिंदे यांना शोधावा लागत आहे का, अशी शक्यता देखील या निमित्याने उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे या मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक राहिले असताना महायुतीकडून भावना गवळी, संजय राठोड वा अन्य कुठला उमेदवार राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma Ritika Sajdeh Baby Boy : दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
CM Yogi Adityanath : अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
Priyanka Gandhi : मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 16  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaUddhav Thackeray : बाळासाहेबांची रूद्राक्षाची माळ मी घराणेशाहीत घेतली - ठाकरेUddhav Thackeray : बाळासाहेबांचा जिव्हाळा असलेल्या शहरात झालेला गद्दाराचा विजय खटकलाUddhav Thackeray on Amit Shah : अमित शाहांना नवरत्न तेल द्या; बुद्धी तल्लख होईल - उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma Ritika Sajdeh Baby Boy : दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
CM Yogi Adityanath : अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
Priyanka Gandhi : मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
Dilip Walse Patil: 'मी शरद पवारांचा मानसपुत्र हे लोक म्हणायचे', पवारांबद्दल बोलताना वळसे पाटील भावूक
'मी शरद पवारांचा मानसपुत्र हे लोक म्हणायचे', पवारांबद्दल बोलताना वळसे पाटील भावूक
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Mike Tyson vs Jake Paul : 27 वर्षाचा तरणा पोरगा 'द माईक टायसन'शी भिडला, 338 कोटींच्या बॉक्सिंग सामन्याची जगभरात चर्चा; कोण हारलं कोण जिंकलं?
27 वर्षाचा तरणा पोरगा 'द माईक टायसन'शी भिडला, 338 कोटींच्या बॉक्सिंग सामन्याची जगभरात चर्चा; कोण हारलं कोण जिंकलं?
Jhansi Hospital Fire Accident : सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, आठ सापडेनात, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
×
Embed widget