Weather : महाराष्ट्राला उन्हाचा चटका; अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा 30 अंशावर, तर उत्तर भारतात काही राज्यात पावसाचा अंदाज
महाराष्ट्रात तापमानात वाढ होत आहे. अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा हा 30 अंशाच्या पुढे गेला आहे. त्यामुळे नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळाला आहे.
Weather : उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे. ताममानात वाढ झाल्यामुळे नाागरिकांना थंडीपासून दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत वाहणाऱ्या वाऱ्यामुळे थोडीशी थंडी राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचा परिणाम माार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दिसू शकतो असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, महाराष्ट्रातही तापमानात वाढ होत आहे. अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा हा 30 अंशाच्या पुढे गेला आहे. त्यामुळे नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळाला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 22 फेब्रुवारीला सिक्कीम, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीर आणि तमिळनाडूच्या किनारपट्टीवर जोरदार वाऱ्यासह हलका पाऊस पडू शकतो. त्याचवेळी, वायव्य भारतातील बहुतांश भागात तापमानात किंचित वाढ जाणवू शकते, असेही हवामान विभगाने सांगितले आहे.
महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढला
महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढला आहे. अनेक जिल्ह्यात ताापानाचा पारा 30 अंशाच्या पुढे गेले आहे. त्यामुळे नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळाला आहे. सोलापूर, सांगली, परभणी, पुणे, जळगाव, अमरावती. चंद्रपूर, अकोला, नागपूर, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तापमान वाढल्याने उन्हाचा चटका जाणवू लागला आहे.
उत्तर प्रदेशात हवामान कसे राहणार?
उत्तर प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून हवामान स्वच्छ असून, दुपारी पडणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे थंडीचा कडाका देखील कमी झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये होळीच्या आसपास पाऊस पडू शकतो. मार्चमध्ये पुन्हा एकदा हवामानात बदल होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मार्चमध्ये यूपीच्या अनेक भागात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हिमाचलमधील हवामान
हिमाचलमधील अनेक भागात काल म्हणजेच रविवारी झालेल्या बर्फवृष्टीमुळे थंडी वाढली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी राज्यातील आठ मध्य आणि उंच पर्वतीय जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि हिमवृष्टी होऊ शकते. पावसाच्या शक्यतेमुळे, 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी राज्यातील अनेक भागात गडगडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ओडिशा
ओडिसामध्ये हवामान बदलण्यास सुरुवात झाली आहे. येत्या 24 तासांमध्ये येथे आणखी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पाच दिवसांनी मुसळधार पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. तर मार्चमध्ये येथे तापमान वाढेल, ज्यामुळे थंडी राज्यातून पूर्णपणे गायब होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
बिहार
बिहारमधील अनेक भागात तापमानात झालेली वाढ आणि सततच्या सूर्यप्रकाशामुळे आता लोकांना थंडीपासून मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. इथे फक्त सकाळी आणि रात्री काही प्रमाणात थंडी जाणवते. रविवारी राज्यामध्ये दिवसभर कडक ऊन होते. मात्र, पश्चिमेकडून वाहत असलेल्या वाऱ्यामुळे दिवसभरात थोडीशी थंडी जाणवत होती. दरम्यान, पुढील तीन दिवस हवामान स्वच्छ आणि आकाश कोरडे राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: