एक्स्प्लोर

देशात भाजपविरोधी आघाडीमध्ये काँग्रेसचं काय? संजय राऊतांनी केलं मोठं वक्तव्य

Nagpur Sanjay Raut Update : आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेससोबत आघाडीसंदर्भात महत्वाचं वक्तव्य केलं आहे.

Nagpur Sanjay Raut Update : आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेससोबत आघाडीसंदर्भात महत्वाचं वक्तव्य केलं आहे. राऊतांनी काँग्रेसशिवाय आघाडी आघाडी बनवायची असं कधीच म्हणालो नाही,काँग्रेससोबतच नवी आघाडी बनली पाहिजे, असं म्हटलं आहे. काल तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील भेटीनंतर देशात भाजपविरोधी आघाडीबाबत मोठी चर्चा सुरु आहे. कालच्या या भेटीनंतर काँग्रेसमधून नाराजीचा सूर आला होता.

याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले, आघाडी वगैरे हे शब्द बदला. या देशांमध्ये तिसरी आघाडी, चौथी आघाडी, पाचवी आघाडी हे प्रयोग कधीच यशस्वी झाल्याचे दिसले नाही. निवडणुका आल्या की आघाडीची चर्चा सुरू होते काल तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर साडेचार तास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले. अनेक विषयांवर चर्चा केली. देशाचे राजकारण यावर सविस्तर चर्चा झाली. अनेक विषयांवर सहमतीही झाली आहे. भविष्यातल्या राजकीय दिशा काय असावी यावरही चर्चा झाली. भविष्यात या दोन नेत्यांनी शिवाय इतर अनेक पक्षाचे नेते एकत्रित भेटणार आहे. आम्ही हे कधीच नाही म्हणालो की काँग्रेसच्या शिवाय काही आघाडी बनवायची आहे. जेव्हा ममता बॅनर्जींनी असं सूतोवाच केलं होतं तेव्हा शिवसेना पहिला पक्ष ज्यांनी काँग्रेससोबतच नवी आघाडी बनली पाहिजे, असं मत व्यक्त केलं होतं, असं राऊतांनी म्हटलं आहे. 

महाराष्ट्रद्वेषी लोकांना जी भाषा समजते त्याच भाषेतच बोलावं;  संजय राऊत 

काल त्यांनी सोमय्या यांच्यावर टीका करताना अपशब्द वापरले होते. आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधत आपल्या भाषेसंदर्भात स्पष्टीकरण दिलं. राऊतांनी म्हटलं की, राजकारणाची भाषा बदलली आहे, असं मुळीच वाटत नाही जे महाराष्ट्र द्रोही आहेत, जे मराठी द्वेष्टे आहेत, जे भ्रष्टाचारी आहेत आणि ज्यांच्या मनात महाराष्ट्राविषयी द्वेष आहे, अशा लोकांना जी भाषा समजते त्याच भाषेतच बोलावं असं आमचे संत सांगून गेले आहेत. 'तुका म्‍हणे ऐशा नरा। मोजून माराव्या पैजारा' असं म्हणत राऊत म्हणाले की, अशा लोकांची काय पूजा करावी, का मिरवणूक काढावी. जर एखादा महाराष्ट्रद्रोही राजकीय पक्षाचा बुरखा घालून आमच्यावर ठुमकत असेल तर मला वाटतं मी खूपच सौम्य भाषा वापरली आहे, असं राऊत म्हणाले. 

चंद्रकांत पाटलांनी स्वतःचा पक्ष सांभाळावा

राऊत म्हणाले की, चंद्रकांत पाटलांना आमच्या पक्षप्रमुखांना विनंती करण्याची गरज ना.ही मी बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून या पक्षाच्या मुख्य प्रवाहात आहे. मी ठाकरे कुटुंबासोबत आहे. चंद्रकांत पाटलांनी आम्हाला न्याय देण्याची गरज नाही त्यांनी स्वतःचा पक्ष सांभाळावा, असं देखील राऊत म्हणाले. राऊतांनी म्हटलं की, भाजपची सवय आहे, जेव्हा ते पराभूत व्हायला लागतात तेव्हा अशा पद्धतीचे आरोप करतात उत्तर प्रदेशात भाजप पराभूत होत आहे. त्यामुळे त्यांचे अखेरचे प्रयत्न सुरू आहेत. देशात लोकशाही संपत आहे, त्याचेच हे परिणाम आहेत. 

माहिती काढण्यासाठी मला कुठल्याही अधिकाऱ्याला भेटायची गरज नाही

राऊत म्हणाले की, काल पोलीस आयुक्तांना भेटलो सदिच्छा भेट होती ते मुंबईलाही अधिकारी राहिलेले आहे म्हणून नागपुरात आल्यावर त्यांना भेटलो. माहिती काढण्यासाठी मला कुठल्याही अधिकाऱ्याला भेटायची गरज नाही. त्यांच्याबद्दल सर्व काही आहे आणि त्यांच्या संदर्भात लवकरच बोलेन. शक्यतो नागपूरला येऊनच बोलेन. नागपूर नक्कीच आता बदललेला आहे. कोरोनामुळे नागपुरात येऊ शकलो नाही, मात्र आता हळूहळू माझ्या नागपूरच्या फेर्‍या वाढतील, असं राऊतांनी म्हटलं.

इतर महत्वाच्या बातम्या

kirit somaiya : डिक्शनरीत जेवढ्या शिव्या आहेत तेवढ्या एकदाच देऊन टाका, सोमय्यांचा राऊतांवर पलटवार 

Kirit Somaiya : मी अशा प्रकारच्या धमक्यांना घाबरत नाही, किरीट सोमय्यांचा राऊतांना इशारा

 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha 

 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, अतुल सावेंची खेळी, भाजपची ताकद वाढणार
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, अतुल सावेंनी डाव टाकला, भाजपची ताकद वाढणार
Ski Resort Hotel Fire Accident : हाॅटेलला लागलेल्या 10 जणांचा होरपळून मृत्यू, 32 जखमी; जीवाच्या आकांताने अनेकांनी 11व्या मजल्यावरून उड्या मारल्या
हाॅटेलला लागलेल्या 10 जणांचा होरपळून मृत्यू, 32 जखमी; जीवाच्या आकांताने अनेकांनी 11व्या मजल्यावरून उड्या मारल्या
Walmik Karad: वाल्मिक कराडविरोधात सर्वात मोठा पुरावा समोर; जितेंद्र आव्हाड कडाडले, 'पोलीस आणि फडणवीस आणखी कोणता मुहूर्त शोधतायत?'
वाल्मिक कराडविरोधात सर्वात मोठा पुरावा समोर; जितेंद्र आव्हाड कडाडले, 'पोलीस आणि फडणवीस आणखी कोणता मुहूर्त शोधतायत?'
Walmik karad CCTV Footage : कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा समोर, मारेकऱ्यांचं सीसीटीव्ही समोर
Walmik karad CCTV Footage : कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा समोर, मारेकऱ्यांचं सीसीटीव्ही समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 21 January  2024Walmik karad CCTV Footage : कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा समोर, मारेकऱ्यांचं सीसीटीव्ही समोरABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 17 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सDream Mall Dead Body : मुंबईतील मॉलमध्ये धक्कादायक घटना,पाण्यात तरंगताना दिसला मृतदेह

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, अतुल सावेंची खेळी, भाजपची ताकद वाढणार
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, अतुल सावेंनी डाव टाकला, भाजपची ताकद वाढणार
Ski Resort Hotel Fire Accident : हाॅटेलला लागलेल्या 10 जणांचा होरपळून मृत्यू, 32 जखमी; जीवाच्या आकांताने अनेकांनी 11व्या मजल्यावरून उड्या मारल्या
हाॅटेलला लागलेल्या 10 जणांचा होरपळून मृत्यू, 32 जखमी; जीवाच्या आकांताने अनेकांनी 11व्या मजल्यावरून उड्या मारल्या
Walmik Karad: वाल्मिक कराडविरोधात सर्वात मोठा पुरावा समोर; जितेंद्र आव्हाड कडाडले, 'पोलीस आणि फडणवीस आणखी कोणता मुहूर्त शोधतायत?'
वाल्मिक कराडविरोधात सर्वात मोठा पुरावा समोर; जितेंद्र आव्हाड कडाडले, 'पोलीस आणि फडणवीस आणखी कोणता मुहूर्त शोधतायत?'
Walmik karad CCTV Footage : कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा समोर, मारेकऱ्यांचं सीसीटीव्ही समोर
Walmik karad CCTV Footage : कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा समोर, मारेकऱ्यांचं सीसीटीव्ही समोर
Vande Bharat Train : 'या' दोन मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार, किती रुपये असणार तिकीट दर?
'या' दोन मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार, किती रुपये असणार तिकीट दर?
Saif Ali Khan Discharged: जीवघेण्या हल्ल्याच्या पाच दिवसांनी सैफ अली खानला डिस्चार्ज; काही दिवस बेड रेस्टचा सल्ला
जीवघेण्या हल्ल्याच्या पाच दिवसांनी सैफ अली खानला डिस्चार्ज; काही दिवस बेड रेस्टचा सल्ला
Nilesh Lanke : हे सरकारच शापित, महायुतीतील बडा मंत्री खासगीत बोललाय; निलेश लंकेंच्या दाव्यानं भुवया उंचावल्या!
हे सरकारच शापित, महायुतीतील बडा मंत्री खासगीत बोललाय; निलेश लंकेंच्या दाव्यानं भुवया उंचावल्या!
Gold Rate Today  : सोने दरात तेजी, मुंबई, पुण्यासह देशभरातील 10 प्रमुख शहरांमधील दर किती?
सोने दरात तेजी, मुंबई, पुण्यासह देशभरातील 10 प्रमुख शहरांमधील दर किती?
Embed widget