Petrol-Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ; तरीही देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर, पण का?
Petrol-Diesel Price Today 21 February 2022 : जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ, तरिही देशातील दर स्थिर आहेत. अशातच देशातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दर स्थिर असल्याचं बोललं जात आहे.
Petrol-Diesel Price Today 21 February 2022 : भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. आठवड्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीसह देशातील सर्वच महानगरांमध्ये आज पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. तरिदेखील देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती तीन महिन्यांपासून स्थिर आहेत. अशातच देशात निवडणुकांमुळे पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असल्याचं बोललं जात आहे. देशातील सर्वच महानगरांपैकी सर्वाधिक दर मुंबईत आहेत. मुंबईत पेट्रोल 110 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे.
निवडणुकांमुळे देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर?
सध्या देशात निवडणुकांचे वारे वाहत आहेत. देशात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. याच पार्श्वभूमीवर देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर (Petrol Price Today) असल्याचं बोललं जात आहे. अशातच निवडणुकांनंतर देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा एकदा कडाडणार असल्याचं बोललं जात आहे. कच्च्या तेलाच्या भावात 2014 सालानंतर पहिल्यांदाच मोठी वाढ झाली आहे. भारताला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. निवडणुकांनंतर भारतातील पेट्रोल-डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात वधारण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
देशातील चार महानगरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. मुबंई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोलची सर्वाधिक किंमत मुंबईमध्ये असून प्रति लिटर 110 रुपयांनी मुंबईत पेट्रोल विकण्यात येत आहे. दिल्लीव्यतिरिक्त कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोल 100 रुपये प्रति लिटर पार पोहोचलं आहे. तेल कंपन्यांनी 4 नोव्हेंबरपासून या महानगरांतील किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. सरकारने 15 जून 2017 पासून बाजारात तेलाच्या किमती लागू केल्या आहेत, ज्यावरून त्यांचे दर दररोज निश्चित केले जातात.
देशात चार महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर काय?
- दिल्लीत पेट्रोल 95.41 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर
- मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर
- चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटर
- कोलकाता पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लिटर
देशात 4 नोव्हेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. केंद्र सरकारनं पेट्रोलच्या उत्पादन शुल्कावर 5 रुपये आणि डिझेलवर 10 रुपये प्रति लिटर घट केली होती. त्यानंतर देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या खाली आलं. महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, राज्यातील अनेक शहरांत पेट्रोलच्या किमती शंभरी पार पोहोचल्या आहेत.
महाराष्ट्रात एक लिटर पेट्रोलचे दर 100 रुपयांहून अधिक आहेत. भारतीय पेट्रोलियम वितरण कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) ने आजचे नवे दर जारी केले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात पेट्रोलचे दर अद्यापही शंभरीपार आहेत. जाणून घेऊयात मुंबई, पुण्यापासून नाशिकसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमतींबाबत...