एक्स्प्लोर
Advertisement
राज ठाकरेंच्या दणक्यानंतर सरकारला जाग, 'डिजिटल गाव हरिसाल'मधले प्रश्न सोडवण्याचे विनोद तावडेंचे आश्वासन
भारतातलं पहिलं 'डिजिटल गाव' अशी ओळख मिळालेल्या हरिसाल या गावाचं खरं सत्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जगासमोर मांडलं. राज ठाकरेंच्या दणक्यानंतर सरकारला जाग आली आहे.
मुंबई : भारतातलं पहिलं 'डिजिटल गाव' अशी ओळख मिळालेल्या हरिसाल या गावाचं खरं सत्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जगासमोर मांडलं. राज ठाकरेंच्या दणक्यानंतर सरकारला जाग आली आहे. या गावातले जे काही तांत्रिक प्रश्न असतील ते सोडवले जातील, असे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे.
अमरावती जिल्ह्यातील हरिसाल हे 'डिजीटल व्हिलेज' असल्याची जाहिरात सरकारकडून करण्यात आली होती. राज ठाकरेंनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात या जाहिरातीबद्दलचा एक व्हिडीओ समोर आणला होता. सरकारकडून या गावाबद्दल जाहिरातीत करण्यात आलेले दावे खोटे असल्याचे त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी सांगितले होते.
राज ठाकरे यांनी सरकारचे दावे खोटे ठरवल्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना राज ठाकरेंचा दावा खोटा असल्याचं सांगितले होते. काल (सोमवार, 15 एप्रिल) राज ठाकरे यांनी सोलापुरात झालेल्या सभेत 'डिजिटल व्हिलेज हरिसाल'च्या जाहिरातीत काम केलेल्या हरिसाल गावच्या मनोहर खडके या तरुणालाच मंचावर बोलावले आणि सरकारचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड केला. त्यामुळे अखेर सरकारला राज ठाकरेंच्या म्हणण्याकडे लक्ष द्यावे लागले आहे. सरकारला जाग आली असून शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी याप्रकरणी लक्ष घालून हरिसालमधील तांत्रिक प्रश्न सोडवले जातील, असे आश्वासन दिले आहे.
VIDEO | राज ठाकरेंकडून मोदींच्या 'डिजिटल भारता'ची पोलखोल | सोलापूर | एबीपी माझा
दरम्यान, डिजिटल व्हिलेजची जाहिरात करणाऱ्या तरुणाला नोकरी का नाही याची चौकशी केली जाईल, असेही तावडे यांनी सांगितले. राज यांनी काल झालेल्या सभेत भाजप सरकारच्या योजना फसल्या आहेत असा आरोप केला होता. याबाबत बोलताना तावडे म्हणाले की, आमच्या योजना फसलेल्या असतील तर ग्रामपंचायत, जिल्हापरिषद, नगरपालिका, महानगरपालिकांमध्ये होणारा भाजपचा विजय आणि मनसेचा गाशा गुंडाळला जाणं, हे कशाचं प्रतीक आहे? असा सवाल तावडे यांनी उपस्थित केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement