एक्स्प्लोर

वारकऱ्यांच्या बसला भीषण अपघात! विठूरायामुळे मोठा अनर्थ टळला; चालक- वाहकावर निलंबनाची कारवाई 

Wardha Varkari Bus Accident : वर्ध्यातून पंढरपूरकडे निघालेल्या बसचा भीषण अपघात झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे 45 वारकऱ्यांना घेऊन निघालेल्या एसटीचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचं समोर आलं आहे.

Wardha Varkari Bus Accident वर्धा : विठ्ठल भेटीच्या ओढीनं लाखो वारकरी पंढरीच्या दिशेनं निघाले आहेत. आज संध्याकाळपर्यंत राज्यभरातून (Maharashtra News) सर्व पालख्या पंढरपुरात (Pandharpur News) दाखल होतील. तर काही गावांतून वारकरी बसनं पंढरपूरकडे निघाले आहेत. अशातच वारकऱ्यांना घेऊन पंढरपूरकडे निघालेल्या बसचा अपघात (Accident News Updates) भीषण अपघात झाला होता. वर्ध्यातून (Wardha News) पंढरपूरकडे निघालेल्या बसला हा अपघात झाला होता. या भीषण अपघातात सुदैवानं कुठलीही जीवितहानी न झाल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र  धक्कादायक बाब म्हणजे, 45 वारकऱ्यांना घेऊन निघालेल्या एसटीचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचं समोर आलं आहे. 

चक्क एसटीचा चालक वाहक मद्यधुंद अवस्थेत

या प्रकरणी आता  मद्यपान करून वारकऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बस चालक आणि वाहकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. काल 15 जुलैच्या रात्री पुसद येथे वारकऱ्यांच्या या बसचा  अपघात झाला होता. यात एसटीचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचं समोर आलं होते.परिणामी विभागीय नियंत्रकाने या बस चालक आणि वाहकावर  निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारला आहे. तपासात बसमध्ये चालक आणि वाहकाजवळ दारूच्या बॉटल्स  आढळून आल्या होत्या.या भीषण अपघातात सुदैवाने 45 वारकरी थोडक्यात बचावले, तर दोन वारकरी गंभीर जखमी झाले होते. सचिन गंगाधर गव्हाणे चालक तर प्रदीप ज्ञानेश्वर सूर्यवंशी असे मद्य प्राशन करणाऱ्या निलंबित वाहकाचे नाव आहेत.

 चालक- वाहकावर निलंबनाची कारवाई 

आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला  वारकरी जात असतात. वर्ध्यावरुन वारकऱ्यांना घेऊन एसटी (बस क्रमांक MH 14 BT 4676) पंढरपूरच्या दिशेनं निघाली होती. मध्यरात्री या एसटीचा भीषण अपघात झाला. वर्ध्याहून निघालेल्या एसटीचा पुसदजवळ अपघात झाला. धक्कादायक बाब म्हणजे, 45 वारकऱ्यांना घेऊन निघालेल्या एसटीचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचं समोर आलं आहे. चालक मद्यधुंद अवस्थेत असल्यानं पुसदमधील माहुर फाट्यावर सुधाकर नाईक पुतळ्याजवळ एसटी एका डिव्हायडरला जाऊन आदळली. एसटीनं डिव्हायडरला एवढ्या जोरात धडक दिली की, आतमध्ये बसलेले वारकऱ्यांना हादरले बसले. 

विठूरायामुळे मोठा अनर्थ टळला

एसटीनं डिव्हायडरला दिलेली धडक एवढी जोरदार होती की, आतमध्ये बसलेले सर्व प्रवासी घाबरले होते. एसटी हादरल्यानंतर आतमध्ये बसलेल्यांना जोरदार हादरे बसले होते. अपघातानंतर एसटी जागेवरच थांबली त्यामुळे मोठी जीवीतहानी टळली. एसटी थांबल्यानंतर आतमध्ये बसलेले वारकरी पटापट एसटी बाहेर पडले. एक वयोवृद्ध महिला आणि एका तरुणाला या अपघातात दुखापत झाली असून त्याला स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. चालक मद्यधुंद अवस्थेत एसटी चालवत असल्यामुळे हा भीषण अपघात घडला. एवढंच नाहीतर, चालकासोबत वाहकही मद्यधुंद असल्याचं वारकऱ्यांना आढळून आलं. 

दरम्यान, विठुराया पाठीशी होता म्हणूनच आपण बचावलो, असं एसटी बसमधील वारकऱ्यांचं म्हणणं आहे. पोलिसांना माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेत, अपघाताची चौकशी सुरू केली आहे.

हे ही वाचा  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Imtiaz Jaleel On Shinde Group : मुख्यमंत्री, गृहमंत्री पैसे वाटतात, कारवाई का नाही? जलील यांचा सवालSunil Raut on Vidhan Sabha : घरी वेळ दिला,थोडा आराम केला...मतदानानंतर सुनील राऊत निवांत!Varsha Gaikwad on Counting : मतमोजणीला दोन दिवस का घेतायत? वर्षा गायकवाड यांचा मोठा सवाल...Jayant Patil Drives Sanjay Raut : शेजारी संजय राऊत, ड्रायव्हिंग सीटवर स्वतः जयंतराव पाटील!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
Embed widget