Walmik Karad : हत्येत नाव येताच वाल्मिक कराड नागपुरातून फरार झाला, 'त्या' महिलांच्या चौकशीत कोणती माहिती समोर आली? त्या महिलांशी काय संबंध??
Walmik Karad : वाल्मिक कराडच्या मुसक्या आवळण्यासाठी बँक खाती गोठवण्यात आली होती. त्यानंतर वाल्मिक कराडशी संबंधित महिलांकडे सुद्धा चौकशी करण्यात आली.
Walmik Karad : बीड जिल्ह्यातील मसजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (वय 44) यांची निर्घृण हत्या करण्यात आली. 9 डिसेंबर रोजी ते घरी जात असताना ही घटना घडली. पवनचक्की प्रकल्पाच्या वादानंतर त्यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली आणि त्यांचा मृतदेह 40 किलोमीटर दूर फेकून देण्यात आला. यानंतर या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा राईट हँन्ड समजल्या जाणाऱ्या वाल्मिक कराडवर हत्येचा सूत्रधार म्हणून आरोप आहे. हत्येचा आरोप झाल्यानंतर वाल्मिक कराड तब्बल 22 दिवसांनी पुण्यात सीआयडी पोलिसांना शरण आला. मात्र, शेकडो पोलिस शोधात असताना आणि सीआयडी सुद्धा तपास करत असताना स्वत:च्या गाडीने वाल्मिक कराड हजर झाल्याने भूवया उंचावल्या आहेत.
दुसरीकडे, वाल्मिक कराडच्या मुसक्या आवळण्यासाठी बँक खाती गोठवण्यात आली होती. त्यानंतर वाल्मिक कराडशी संबंधित महिलांकडे सुद्धा चौकशी करण्यात आली. त्यानंतर वाल्मिक कराड शरण आल्याची चर्चा आहे.
खंडणीचा गुन्हा दाखल होताच कराड गेला कुणीकडे?
पवनचक्की प्रकल्पात दोन कोटींची खंडणी मागतिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. खंडणीचा गुन्हा दाखल झाला त्यावेळी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होते. त्यावेळी कराड नागपूरला असल्याची माहिती समोर आली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये आरोपी करण्याची मागणी झाल्यानंतर वाल्मिक कराड फरार झाला. फरार झाल्यानंतर तो सुरवातीला काही दिवस पुण्यात राहिला. त्यानंतर साधारण आठ दिवसापूर्वी तो महाराष्ट्रा बाहेर फरार झाला. त्यानंतर सुरवातीला गोवा, कर्नाटक आणि इतर राज्यात फिरत राहिला होता.
त्या महिलांच्या चौकशीत माहिती समोर आली?
दरम्यान, सीआयडीमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाल्मिक कराडची ज्या महिलेकडे सीआयडीने चौकशी केली त्या महिलेकडे सुरवातीचे काही दिवस राहिल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे, शरण आला त्यावेळी तो कोणत्या राज्यात होता याची खात्रीलायक माहिती जरी नसली तरी त्याला महाराष्ट्रात येण्यासाठी गाडीने दोन दिवस लागल्याची माहिती आहे. दरम्यान, वाल्मिक कराडच्या निकटवर्तीय महिलेची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर ही महिला कोण? अशी चर्चा रंगली होती. दरम्यान, ती महिला धाराशिव जिल्ह्यामधील असून वाल्मिक कराडची निकटवर्तीय आहे. यापूर्वी धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरातील महिलेचा गुन्ह्यात वापर करण्याचा प्रयत्न केल्याच आरोप आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी हा आरोप केला होता. यापूर्वी या महिलेचा खोट्या विनयभंगांच्या तक्रारीसाठी वापर केल्याचा आरोप होत आहे.
28 मे : आवडा कर्मचाऱ्यांचे अपहरण
दरम्यान, केज तालुक्यातील आवाडा या खासगी पवनचक्की कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे काही लोकांनी अपहरण केले. लोकांनी त्याच्याकडे काम सुरू करण्यासाठी 2 कोटी रुपयांची मागणी केल्याची माहिती आहे. कंपनी पवनचक्की प्रकल्पासाठी जमीन संपादित करण्याच्या प्रक्रियेत होती. रमेश घुले हा मुख्य आरोपी आहे. केज पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
6 डिसेंबर : आवाडा साईटवर हल्ला
घुलेच्या नेतृत्वाखालील गटाने आवाडा साईटवर हल्ला केला. आत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आणि रक्षकांवर त्यांनी हल्ला केला. सरपंच संतोष देशमुख यांना निरोप देण्यात आला. काही ग्रामस्थांसह ते घटनास्थळी पोहोचल्यानंतर संतोष देशमुख यांची सुदर्शन घुलेशी बाचाबाची झाली. ही घटना गावकऱ्यांनी मोबाईल फोन कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली होती. यानंतर सुदर्शन घुलेला अटक करण्यात आली, मात्र एका दिवसानंतर जामीन मिळाला.
9 डिसेंबर : संतोष देशमुख यांचे अपहरण
दुपारी तीनच्या सुमारास सुदर्शन घुलेच्या नेतृत्वाखाली या आरोपींनी देशमुख यांची गाडी थांबवून त्यांना एसयूव्हीमध्ये ओढले. काही तासांनंतर त्यांचा मृतदेह सापडला.
इतर महत्वाच्या बातम्या