Santosh Deshmukh Case: इकडे वाल्मिक कराडला CPAP मशीन वापरण्यास मंजुरी, तिकडे कृष्णा आंधळे वॉन्टेड घोषित!
कोठडीत आजारी पडलेल्या वाल्मीक कराडला कोठडीत CPAP मशीन वापरण्यास मंजुरी देण्यात आली आहे . तर दुसरीकडे या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला बीड पोलिसांनी वॉन्टेड घोषित केलं आहे .
Santosh deshmukh Case: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असणाऱ्या वाल्मीक कराडला (Walmik Karad) बीड विशेष सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली . मात्र पोलीस कोठडीतच सर्दी तापाने आजारी पडलेल्या वाल्मीक कराड यांना CPAP मशीन वापरण्यास कोर्टाने मंजुरी दिली आहे . तर दुसरीकडे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे (Krushna Andhale) याला बीड पोलिसांनी वॉंटेड म्हणून घोषित केलं आहे . हत्या प्रकरणानंतर कृष्णा आंधळे अद्याप फरार असून तपास यंत्रणा त्याचा शोध घेत आहेत . कृष्णा आंधळे वांटेड घोषित करून माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर करण्यात आले आहे . (Beed News)
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील तपासाला वेग आला असून एकीकडे खंडणी आणि मकोका अंतर्गत वाल्मीक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे . दरम्यान कोठडीत आजारी पडलेल्या वाल्मीक कराडला कोठडीत CPAP मशीन वापरण्यास मंजुरी देण्यात आली आहे . तर दुसरीकडे या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला बीड पोलिसांनी वॉन्टेड घोषित केलं आहे . (Santosh Deshmukh Case)
वाल्मीक कराडला CPAP वापरण्यास मंजुरी
मकोका अंतर्गत सात दिवसांची कोठडी संपल्यानंतर आज वाल्मीक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे .दरम्यान व्हॉइस कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात वाल्मीक कराडला हजर करण्यात आले होते . कोर्टात हजर करण्यापूर्वी वैद्यकीय पथकातील डॉक्टरांनी वाल्मीक कराडची सामान्य तपासणी केली . यात त्यांना सर्दी तापाच्या गोळ्याही देण्यात आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं .दरम्यान, वाल्मीक कराड यांना स्लीप एपनिया नावाचा आजार असून त्यांना कोठडीत CPAP मशीन वापरण्यास परवानगी द्यावी अशी मागणी वाल्मीक कराड यांच्या वकिलांनी केली होती . ही मागणी न्यायालयाने मंजूर केली आहे . CPAP मशीन स्लीप एपनिया आणि अस्थमाच्या उपचारांसाठी वापरली जाते . हे एक वैद्यकीय उपकरण आहे जात झोपेत श्वासोच्छवास सुरळीत होण्यास येणारी अडचण दूर होते . (Walmik Karad)
फरार कृष्णा आंधळे वॉन्टेड घोषित !
संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे फरार असून बीड पोलिसांनी त्याला वॉन्टेड म्हणून घोषित केले आहे . देशमुख हत्या प्रकरणानंतर कृष्णा आंधळे अद्याप फरार असून तपास यंत्रणा त्याचा शोध घेत आहे .मात्र अद्याप त्याचा शोध लागला नसल्याने बीड पोलिसांनी त्याला वॉन्टेड घोषित करून आरोपीचा ठावठिकाणा कोणास माहित असेल किंवा फोटोमधील आरोपी दिसून आल्यास तात्काळ बीड पोलिसांना संपर्क साधण्याचा आवाहन केलं आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाणार असून त्याला योग्य ते बक्षीसही दिले जाणार आहे .(Krushna Andhale)
हेही वाचा:
Walmik Karad: वाल्मीक कराड पोलीस कोठडीत आजारी पडला,वकिलांची कोर्टात मोठी मागणी, म्हणाले..