एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एसटी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपासाठी मतदान, 90 टक्के कर्मचाऱ्यांचा संपाच्या बाजूने कौल
धुळे : राज्यातल्या विविध संघटना आपल्या मागण्यांसाठी संपावर जाताना आपण नेहमी ऐकतो. यात शेतकरी, कामगार, रिक्षा आदी संघटना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतात. अन् नंतर पत्रकार परिषद घेऊन संपाची घोषणा करतात. पण एसटी कार्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपासाठी राज्यात पहिल्यांदाच मतदान घेतलं होतं. त्याचा निकाल नुकाताच जाहीर झाला असून, यात 90 टक्के कर्मचाऱ्यांनी संपाच्या बाजूनं मतदान केलं आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि भत्ते मिळावेत, यासाठी येत्या जून महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. पण यासाठी पारंपरिक पद्धतीने निर्णय घेण्याऐवजी राज्यातील सर्व एसटी कर्मचाऱ्यांचं म्हणणं जाणून घेण्यात आलं.
या संपासाठी MRTU आणि PULP कायद्यातील तरतुदीनुसार, मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेच्या माध्यमातून 26 आणि 27 मे रोजी एसटी महामंडळाच्या राज्यातील सर्व आगारात मतदान घेण्यात आलं. या मतदान प्रक्रियेत राज्यातील सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
धुळे एसटी आगारात या मतदान प्रक्रियेची मतमोजणी राबवण्यात आली. यात 90 टक्के एसटी कर्मचाऱ्यांनी संपाच्या बाजूनं मतदान केल्याची माहिती समोर आली आहे.
वास्तविक, मतदानाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचा कौल जाणून घेण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग म्हणावा लागेल. पण लोकशाहीच्या माध्यमातून संपाचा निर्णय घेण्यात आल्याने सर्वच कर्मचाऱ्यांना आपलं म्हणणं मांडता आलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
शेत-शिवार
मुंबई
निवडणूक
Advertisement