मोठी बातमी : सांगलीच्या जागेसाठी विश्वजीत कदम यांची दिल्लीत वणवण; हायकमांडचा भेटण्यास नकार
Lok Sabha Election 2024 : सांगलीच्या जागेसाठी विश्वजीत कदम यांची दिल्लीत वणवण पाहायला मिळत असून, हायकमांडकडून भेट देण्यास नकार देण्यात आला आहे.
Lok Sabha Election 2024 : सांगली लोकसभा मतदारसंघाच्या (Sangli Lok Sabha Constituency) जागेवरून काँग्रेसमध्ये (Congress) नाराजी पाहायला मिळत आहे. त्यामुळे काँग्रेसचे एक शिष्टमंडळ थेट दिल्लीत पोहचले असून, पक्षातील दिल्लीतील नेत्यांकडे याबाबत आपली भूमिका मांडणार आहे. ज्यात सांगलीच्या जागेसाठी आग्रही असणारे विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांचा देखील समावेश आहे. मात्र, सांगलीच्या जागेसाठी विश्वजीत कदम यांची दिल्लीत वणवण पाहायला मिळत असून, हायकमांडकडून भेट देण्यास नकार देण्यात आला आहे. त्यामुळे मुकुल वासनिक आणि के.सी.वेणुगोपाल यांच्या भेटीवरच त्यांना समाधान मानावे लागले आहे.
महाविकास आघाडीमधील जागेचा तिढा काही सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या मतदारसंघातून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर होताच विश्वजीत कदम यांच्यासह इच्छुक उमेदवार विशाल पाटील दिल्लीत पोहचले आहेत. मात्र, सांगलीच्या जागेसाठी आग्रही असणारे विश्वजीत कदम यांना सोनिया गांधी, राहुल गांधीची भेट मिळालेली नाही. तसेच, मल्लिकार्जुन खर्गे देखील दिल्लीत नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे विश्वजीत कदम यांची दिल्लीत वणवण पाहायला मिळत आहे. तर, चंद्रहार पाटील यांच्याविरोधात तक्रार करायला आलेल्या काँग्रेस नेत्यांना भेटण्यास हायकमांडने नकार दिल्याने विश्वजीत कदम यांच्या हाती काही लागण्याची शक्यता कमी आहे. तर, दिल्लीत पोहचलेल्या मुकुल वासनिक आणि के.सी.वेणुगोपाल यांच्या भेटीवरच त्यांना समाधान मानावे लागले आहे.
सांगलीची जागा आमचा पारंपारिक मतदारसंघ : विश्वजीत कदम
दिल्लीत गेलेल्या विश्वजीत कदम यांनी 'एबीपी माझा'ला प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे की, “महाविकास आघाडीत ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्रित लोकसभा निवडणूक लढवत आहोत. सांगलीची जागा आमचा पारंपारिक मतदारसंघ आहे. देशाला स्वतंत्र मिळाल्यापासून 2014 पर्यंत सांगलीने काँग्रेस पक्षाला खासदार दिला आहे. आज देखील आमचे दोन आमदार येथून आहे. राष्ट्रवादीचे देखील आमदार आहे. सांगलीत काँग्रेसचे संघटन आहे, काँग्रेसची विचारसरणी आहे. त्यामुळे आम्हाला येथून उमेदवारी मिळाली पाहिजे असे विश्वजित कदम म्हणाले आहेत.
चंद्रहार पाटलांच्या विरोधात काँग्रेसची मोहीम
ठाकरे गटाने सांगली लोकसभा मतदारसंघातून चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे. या उमेदवारीमुळे काँग्रेसमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. याचे पडसाद आता थेट सोशल मीडियावर उमटताना पाहायला मिळत आहे. काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या विशाल पाटील यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर मोहीम राबवत चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केलाय. यासाठी 'नो मशाल, ओन्ली विशाल' अशी मोहीम सोशल मीडियावर राबवली जातेय.
इतर महत्वाच्या बातम्या :